शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला, वाशिममध्ये चार शेतक-यांची आत्महत्या

By admin | Updated: September 24, 2015 01:55 IST

नापिकी, कर्ज आणि मुलीच्या लग्नाची चिंता

अकोला : अकोला जिल्ह्यातील दोन, तर वाशिम जिल्हयातील कारंजा आणि रिसोड तालुक्यातील दोन शेतकर्‍यांनी सततची नापिकी, तसेच कर्जबाजारीपणामुळे बुधवारी आत्महत्या केली. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथील शेतकरी अरूण मारोतराव फिसके (वय ४३) यांनी बुधवारी घरातच वीष प्राशन करून आत्महत्या केली. घटनेच्यावेळी घरी कुणीही नव्हते. त्यांच्या तिन्ही मुली शाळेत गेल्या होत्या, तर पत्नी मुलींना शाळेत सोडण्यासाठी गेली होती. फिसके यांच्याकडे दोन एकर कोरडवाहू शेती असून, सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणास ते कंटाळले होते. या चिंतेतून त्यांनी बुधवारी जिवनयात्रा संपवली. पातूर येथील शेतकरी मधुकर इनामदार यांचा मोठा मुलगा गणेश (वय २५) याने नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेऊन बुधवारी आत्महत्या केली. मधुकर इनामदार यांच्याकडे एकूण दीड एकर शेती आहे. या शेतीची व परिवाराची संपूर्ण जबाबदारी गणेशवरच होती. मधुकर इनामदार हे अनेक दिवसांपासून दुर्धर आजाराने ग्रस्त असून, आईसुद्धा आजारी आहे. सततची नापिकी आणि खासगी सावकाराच्या कर्जामुळे चिंतातूर असलेल्या गणेशने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रिसोड तालुक्यातील ग्राम धोडप येथील ४५ वर्षीय शेतकरी भागवत दत्तात्रय बोरकर यांनी स्वत:च्या शेतामध्ये झाडाला गळफास घेऊन २३ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता आत्महत्या केली. बोरकर यांच्याकडे ५ एकर जमीन होती, त्यावर अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ७0 हजार रुपयांचे कर्ज होते. याशिवाय त्यांच्यावर सावकारी कर्जही होते. त्यांच्या पश्‍चात ३ मुली, १ मुलगा, पत्नी आणि मोठा आप्त परिवार आहे. तीन मुलींपैकी १ मुलगी लग्नाची असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. मुलीच्या लग्नाची चिंता, सततची नापिकी, दुष्काळी परिस्थिती आणि कर्जबाजारीपणामुळे या शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचे गावकर्‍यांनी सांगितले. कारंजा तालुक्यातील निंभा जहाँगीर येथील अल्पभूधारक शेतकरी विश्‍वास गोविंदराव उगले (५५) यांनी आर्थिक विवंचनेतून स्वत:च्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. उगले यांच्याकडे २ एकर कोरडवाहू शेती होती. त्यावर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे १0 हजार रुपयाचे कर्ज होते. यावर्षी त्यांनी अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे कर्जाची मागणी केली होती; पण त्यांना कर्ज मिळाले नाही. गत दोन ते तीन वर्षापासून शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने आणि बँकेनेही कर्ज नाकारल्याने ते आर्थिक संकटात सापडले होते. परिस्थितीपुढे हतबल होऊन त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.