शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अकोल्यात कोरोनामुळे एकाच दिवशी चौघांचा मृत्यू, २०० नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 20:04 IST

CornaVirus in Akola शनिवार, २० फेब्रुवारी रोजी आणखी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३५२ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला असून, शनिवार, २० फेब्रुवारी रोजी आणखी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३५२ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १७३, तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये २७ अशा एकूण २०० पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १३,५९३ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ६६२ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १७३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४८९ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मुर्तिजापूर येथील २३, जीएमसी येथील १२, कौलखेड येथील १०, डाबकी रोड येथील नऊ, विरवाडा ता.मुर्तिजापूर येथील आठ, भारती प्लॉट, गोरक्षण रोड व जठारपेठ येथील प्रत्येकी सहा, दगडी पुल, खडकी व लखनवाडा येथील प्रत्येकी पाच, रामदासपेठ येथील चार, मलकापूर येथील तीन, व्हीबीएच कॉलनी,तुकाराम चौक, खडकी, धोगा, मोठी उमरी, जवाहर नगर, गायगाव, सूधीर कॉलनी, घुसर, मनकर्णा प्लॉट, गड्डम प्लॉट व खदान येथील प्रत्येकी दोन, व्यंकटेश नगर, कोठारी नगर, अशोक नगर, कलमेश्वर, रजपुतपूरा, पोलिस हेडक्वॉटर, अकोट फैल, स्वराज्य भवन, कान्हेरी सरप, जीएमसी हॉस्टेल, तापडीया नगर, नवरंग सोसायटी, गंगाधर प्लॉट, किर्ती नगर, न्यु राधाकिसन प्लॉट, कॉग्रेस नगर, गंगा नगर, तोष्णीवाल लेआऊट, बोरगाव मंजू, रवी नगर, विद्या नगर, अपोती, खोलेश्वर, वानखडे नगर, आश्रय नगर, केडीया प्लॉट, देवरावबाबा चाळ, शिवनगर, हाजी नगर, हरिहर पेठ, रतनलाल प्लॉट, पवन वाटीका, अकोली, जूने शहर, उमरी, मोरेश्वर कॉलनी, डोंगरगाव, गीता नगर, हिवरखेड, शिवाजी नगर, कोठारी वाटीका, एसबीआय कॉलनी, दहिहांडा, गायत्री नगर, शास्त्री नगर, पिंजर व पार्वती नगर येथील प्रत्येकी एक असे १७३ पॉझिटिव्ह आहेत.

तीन महिला व पुरुषाचा मृत्यू

शनिवारी सकाळी कृषि नगर, खदान येथील ३० वर्षीय महिला आणि विजय हाऊसिंग कॉलनी येथील ७३ वर्षीय महिला अशा दोन कोविडबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. दोघींनाही अनुक्रमे १७ आणि ९ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते. सायंकाळी अकोट येथील ८० वर्षीय महिला व निंबा ता. मूर्तिजापूर येथील ७५ वर्षीय पुरुष या आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. या दोघांनाही अनुक्रमे १९ व १७ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

रॅपिड चाचण्यांमध्ये २७ पॉझिटिव्हशुक्रवार १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या १५१ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये २७ जण पॉझिटिव्ह आढळून आले. आतपर्यंत झालेल्या एकूण ३३,६५६ चाचण्यांमध्ये २३४८ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

७५ जणांना डिस्चार्जशनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १४, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, बिहाडे हॉस्पीटल येथून सात, अवघाते हॉस्पीटल येथून पाच, स्कायलार्क हॉटेल येथून तीन, सुर्यचंद्र हॉस्पिटल येथून सात, तर होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले ३४ अशा एकूण ७५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

१,७४५ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३,५९३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,४९६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३५० जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत १,७५४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या