अकोला, दि. ३- जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पीकेव्ही गेटजवळ एका अनोळखी इसमाचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतकाची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पीकेव्ही गेटजवळ एका ५0 वर्षीय इसमाचा मृतदेह पडून असल्याची माहिती जुने शहर पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतकाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला मात्र, कोणतेही ओळखपत्र नसल्याने पोलिसांना मृतकाची ओळख पटली नाही. पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
अर्धनग्न अवस्थेत आढळला इसमाचा मृतदेह!
By admin | Updated: March 4, 2017 02:37 IST