शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कंपनी प्रतिनिधीच्या उपस्थितीत घेतले नमुने; शेतकरी अनभिज्ञ!

By admin | Updated: March 3, 2016 02:23 IST

वांझोटी केळी रोपे प्रकरण; कृषी विभागावर शेतक-यांचा संशय!

आकोट/आंबोडा: केळीची वांझोटी रोपे देऊन शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी तालुका तक्रार निवारण समितीने कृषी तज्ज्ञांना सोबत घेत केळीची पाहणी करून नमुने घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या कंपनीच्या प्रतिनिधीला सोबत घेणार्‍या कृषी विभागाने मात्र फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांना पूर्वसूचना देण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या भुवया उंचावल्या. अत्यंत घाईत आणि कंपनीच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत कोणते नमुने घेतले, अद्यापपर्यंंतही संबंधित कंपन्यांवर कारवाई का झाली, असे एक ना अनेक सवाल आता शेतकरी यानिमित्ताने उपस्थित करीत आहेत. कृषी अधिकारी-कंपनीचे प्रतिनिधी एकाच वाहनात! गुन्हा दाखल असलेल्या माऊली हायटेक नर्सरी या कंपनीचे प्रतिनिधी व कृषी अधिकारी, पोलीस स्टेशनला फिर्याद देणारे, अधिकारी हे शासकीय वाहनामध्ये बसून केळी पिकांचे नमुने घेण्याकरिता आंबोडा येथे आले होते.वांझोटी केळी रोपेप्रकरणी शेतकर्‍यांचे सवालवांझोटी केळी रोपेप्रकरणी शेतकर्‍यांनी आता काही सवाल उपस्थित केले आहेत. कंपन्यांना अभय कोणाचे? शेतकर्‍यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तक्रार निवारण समितीने तपासणी केली होती. शेतकर्‍यांनी फेब्रुवारी २0१५ मध्ये मे. वसंत बायोटेक ( पुसद) व इंद्रायणी अँग्रोटेक (पणज) यांच्याकडे अग्रीम रक्कम भरून केळी रोपांची मागणी नोंदविली; मात्र प्रत्यक्षात शेतकर्‍यांना माउली हायटेक नर्सरी या कंपनीची रोपे पुरविण्यात आली होती. कंपनीने बियाणे कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी रमेश रामचंद्र आकोटकर (संचालक- इंद्रायणी अँग्रोटेक), वसंत बायोटेक व माउली नर्सरीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. प्रकरण कृषी आयुक्तांपर्यंंत पोहोचल्यानंतरही कृषी विभाग कंपन्यांवर तातडीने कारवाई होण्यासाठी पावले का उचलत नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. यापूर्वीच पाहणी का केली नाही? यापूर्वी कृषितज्ज्ञांच्या समितीने १२ फेब्रुवारी रोजी आंबोडा येथे केळीची पाहणी केली होती. केळीच्या वाणामध्ये उत्पादनक्षमता आढळून आली नसून, उत्पादनात ७0 घट झाल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे, असा निष्कर्ष तालुकास्तरीय कृषितज्ज्ञांच्या तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने अहवालात नोंदविला होता. आता पुन्हा पाहणी करून कृषितज्ज्ञ केव्हा अहवाल देणार आहेत, ही प्रक्रिया यापूर्वीच का पार पाडली नाही, असे प्रश्न शेतकर्‍यांमधून उपस्थित करण्यात येत आहेत.