शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक संस्थेच्या माजी पदाधिका-यांवर समलैंगिक शोषणाचा आरोप

By admin | Updated: July 7, 2015 01:44 IST

पत्रपरिषदेत दाखविली अश्लील चित्रफीत.

अकोला: नोकरीमध्ये कायम करण्याचे आमिष दाखवून समलैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप, शहरातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या कर्मचार्‍याने त्याच संस्थेच्या दोन माजी पदाधिकार्‍यांवर सोमवारी पत्रकार परिषदेत केला. हा कर्मचारी युवक या शैक्षणिक संस्थेद्वारा चालविल्या जाणार्‍या एका महाविद्यालयाच्या वसतिगृहावर रोजंदारीने कार्यरत असून, त्याच्या आरोपांची सदर शैक्षणिक संस्थेद्वारा संचालित शाळेच्या एका माजी मुख्याध्यापकानेही पुष्टी केल्याने खळबळ उडाली आहे. पीडित युवकाचा एक मित्र संबंधित महाविद्यालयामध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहे. त्याच्या ओळखीने महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहाची देखभाल आणि बगिच्याचे काम करण्यासाठी, संस्थेच्या दोन माजी पदाधिकार्‍यांनी पीडित युवकाला २00७ मध्ये ४0 रुपये रोजाप्रमाणे कामावर घेतले होते. पीडित युवकाच्या म्हणण्यानुसार, दोन्ही पदाधिकार्‍यांनी त्याला नोकरीमध्ये कायम करण्याचे आमिष दाखवून, त्याच्याशी बलपूर्वक समलैंगिक संबंध प्रस्थापित केले. महाविद्यालयाच्या प्राध्यापक क्वॉर्टर्सवर बोलावून हे महाभाग स्वत: मद्यप्राशन करायचे आणि आपणासही बळजबरीने मद्यप्राशन करायला लावून लैंगिक चाळे करायचे. सात ते आठ वर्षे दोघांनीही आपला लैंगिक छळ केला; परंतु नोकरीत कायम केले नाही, अशी आपबिती पीडित युवकाने सोमवारी पत्रकार परिषदेत कथन केली. पत्रकार परिषदेस सदर शैक्षणिक संस्थेद्वारा संचालित शाळेचे एक माजी मुख्याध्यापकही उपस्थित होते. न्याय मिळत नसल्याने यासंदर्भात सिव्हील लाईन्स पोलिसांकडे तक्रार दिली असल्याचे त्यांनी सांगितले. युवकाच्या आरोपांची त्यांनीही पुष्टी केली. पीडित युवकाने आरोपांच्या पुष्ट्यर्थ, दोन्ही पदाधिकार्‍यांच्या विकृत मानसिकतेची १५ मिनिटांची चित्रफीत पत्रकार परिषदेत दाखविली. चित्रफितीमध्ये दोन्ही पदाधिकारी युवकाचे लैंगिक शोषण करताना दिसतात. यासंदर्भात दोन्ही पदाधिकार्‍यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, दोघांचेही भ्रमणध्वनी बंद असल्याचे आढळून आले.