शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वन विभाग होणार ‘हाय टेक’

By admin | Updated: September 14, 2014 01:52 IST

कर्मचार्‍यांना मिळणार ‘पीडीए’: वन गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई.

अकोला: राज्यातील इतर शासकीय विभागांप्रमाणेच वन विभागही लवकरच  हाय टेक होणार आहे. वन कर्मचार्‍यांना आता पर्सनल डिजिटल असिस्टंट (पीडीए) या नावाने ओळखल्या जाणारी इलेक्ट्रॉनिक यंत्रे देण्यात येणार आहेत. निर्मनुष्य जंगलात कोणताही गुन्हा घडल्यास, त्याची छायाचित्रे व पंचनामा तात्काळ वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी पीडीएचा वापर केला जाईल. त्यामुळे गुन्ह्यांचा जलद गतीने तपास होऊन, दोषींवर सबळ पुराव्यांच्या आधारे त्वरीत कारवाई करणे शक्य होणार आहे. जंगलामध्ये वृक्षतोड, वन्य प्राण्यांची शिकार किंवा इतर कोणताही वन गुन्हा घडल्यास, चौकशी, पंचनामा व नंतर त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यामध्ये बराच कालावधी उलटतो. परिणामी गुन्हा घडल्यावर प्रत्यक्ष तपास सुरू होईपर्यंत त्यातील गांभीर्य संपते. वन कर्मचारी कॅमेर्‍याने छायाचित्रे काढून, पंचनामादी सोपस्कार आटोपल्यानंतर कागदपत्रे गोळा करून टपालाने वरिष्ठांकडे कार्यालयात पाठवितात. बरेचदा जंगलातील घटनास्थळापासून टपाल कार्यालय लांब असल्याने, किंवा कागदपत्रे पाठविण्याची दुसरी सुविधा उपलब्ध नसल्याने, कर्मचार्‍यांना स्वत: कार्यालयात जाऊन अहवाल सादर करावा लागतो. एखाद्या हिंस्त्र प्राण्याने गुराढोरांची शिकार केल्याचे आढळल्यास, हिंस्त्र प्राण्याच्या पायाचे ठसे व शिकारीचे स्वरूप प्रत्यक्ष पाहण्याकरिता वरिष्ठ अधिकार्‍यांना बरेचदा घटनास्थळी जावे लागते. त्याकरिता सुमारे आठ दिवसांचा कालावधी लागतो. या पार्श्‍वभूमीवर तपास जलदगतीने होण्यासाठी ह्यहाय टेकह्ण यंत्रणा वापरण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. त्यासाठी जंगलामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना पीडीए देण्यात येणार आहेत. ** गुन्हा व कारवाईचा राहणार कोड वर्डजंगलामध्ये कोणता गुन्हा घडला व त्याचे स्वरूप काय आहे, याची माहिती देण्यासाठी वन कर्मचार्‍यांना गुन्ह्यानुसार काही कोड वर्डही देण्यात येणार आहेत. जंगलात एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याची माहिती विभागाबाहेरील व्यक्तीला मिळू नये व कारवाई गुप्त राहावी, यासाठी ह्यकोड वर्डह्ण वापरण्यात येणार आहेत. ** १६ सप्टेंबरला कार्यशाळा राज्यात वन विभागाच्या विभागीय कार्यालयांमध्ये १६ सप्टेंबरला ह्यपीडीएह्ण व त्याच्या वापराबद्दल कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेला वन विभाग, वन्य जीव विभाग व सामाजिक वनिकरण विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेत पीडीएचा वापर, त्याची उपयुक्तता व त्यामध्ये येणार्‍या अडचणींची माहिती देण्यात येणार आहे.