शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारले विरंगुळा केंद्र; महापालिकेचा उपक्रम

By आशीष गावंडे | Updated: August 25, 2023 18:41 IST

मुख्य पाेस्ट ऑफीस मागे मनपा शाळेत लाेकार्पण

अकोला: आयुष्याच्या सायंकाळी काही क्षण निवांत घालविण्याच्या उद्देशातून महापालिका प्रशासनाने शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरु केले आहे. मुख्य पाेस्ट ऑफीस मागील मनपाच्या शाळा क्रमांक ११ मध्ये मनपाने ज्येष्ठ नागरिकांना करमणुकीसाठी विविध साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. अशाप्रकारे पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी निशुल्क उपक्रम सुरु केल्यामुळे मनपा प्रशासनाच्या भूमिकेचे काैतुक केले जात आहे. 

कुटुंबाची व पाेटच्या मुलाबाळांची शेवटच्या श्वासापर्यंत काळजी करणाऱ्या आइ-वडिलांना वृध्दापकाळात घरातीलच सदस्यांकडून अपमानजक वागणूक दिली जाते. आयुष्याचा अखेरचा प्रवास सुखकर व्हावा,अशी सर्वांची मनाेमन इच्छा राहते. परंतु काही संवेदना हरपलेल्या पाल्यांकडून वयाेवृध्द माता-पित्यांचा मानसिक छळ केला जाताे. अनेकदा पाेटचा मुलगा व सून खाण्यापिण्याची आबाळ करत असल्याच्या तक्रारी पाेलिस ठाण्यात दाखल हाेतात.

घरात मिळणाऱ्या अपमानजनक वागणुकीमुळे आत्मसन्मान दुखावलेल्या वयाेवृध्दांना घरात राहणे नकाेसे हाेते. अशावेळी त्यांना उर्वरित आयुष्यातील काही क्षण निवांत घालवता यावेत, या उदात्त भावनेतून महापालिका प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला हाेता. या निर्णयाला प्रशासनाने मुर्तरुप दिले असून मुख्य पाेस्ट ऑफीस मागील महापालिकेच्या शाळा क्रमांक ११ मधील दाेन प्रशस्त वर्ग खाेल्यांमध्ये विरंगुळा केंद्र सुरु केले आहे. शहरातील समस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी हा उपक्रम निशुल्क असणार आहे. या उपक्रमाचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

ज्येष्ठ नागरिक संघाला मदतमागील अनेक वर्षांपासून ज्येष्ठांसाठी व विविध सामाजिक उपक्रमात सहभाग नाेंदविणाऱ्या ज्येष्ठ नागरिक संघाला महापालिकेने शाळेच्या आवारात वर्ग खाेली उपलब्ध करुन दिली हाेती. हा उपक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठीच असल्यामुळे प्रशासनाने दाेन वर्ग खाेल्यांचे नुतणीकरण केले. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या केंद्राचा लाेकार्पण साेहळा पार पाडला.

मनपाकडून साहित्य,मुलभूत सुविधांची पूर्ततामहापालिकेने ज्येष्ठ नागरिकांच्या मनाेरंजनासाठी एक एलइडी, दाेन कॅरम बोर्ड, गित गायनासाठी साउंड सिस्टीम, वाचनासाठी कथा, कादंबऱ्या व पुस्तके, बैठक व्यवस्थेकरिता खुर्च्या, सतरंज्या आदी साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. तसेच अधिकृत विद्यूत कनेक्शन, नळ जाेडणी देत छतावर टाकी बसवून पाणीपुरवठ्याची व्यवस्था, महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा दिली आहे.

टॅग्स :Akolaअकोला