शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बंगळूरू , नागपूरमधील मुले अकोल्यात घेताहेत फुटबॉलचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 15:08 IST

यंदा आयोजित उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबिरात अकोला शहर आणि जिल्ह्यातीलच नव्हे तर बंगळुरू , नागपूर, हिंगोली, वाशिम,मालेगाव येथील मुले दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देमोहसिन अली शहिदी स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित नि:शुल्क फुटबॉल प्रशिक्षण शिबिर यंग ब्लड फुटबॉल क्लबने आयोजित केले आहे.शिबिरातून उच्चस्तर खेळाडू निर्माण करण्याचा संकल्प यंग फुटबॉल क्लबच्या प्रशिक्षकांचा मानस आहे.फुटबॉलमधील आधुनिक तंत्रज्ञान आणि तंत्रशुद्ध कसे खेळायचे, याबाबत प्रशिक्षक अन्जार अहमद कुरेशी प्रशिक्षण देत आहेत.

अकोला: ‘मिनी कलकत्ता (कोलकाता)’असे एकेकाळी ओळख फुटबॉल जगतात अकोला शहराचे नाव होते. मध्यंतरी ही ओळख धुसर झाली; मात्र आता नव्याने अकोला फुटबॉलमध्ये चैतन्य स्फुरले आहे. यंदा आयोजित उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबिरात अकोला शहर आणि जिल्ह्यातीलच नव्हे तर बंगळुरू , नागपूर, हिंगोली, वाशिम,मालेगाव येथील मुले दाखल झाले आहेत.मोहसिन अली शहिदी स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित नि:शुल्क फुटबॉल प्रशिक्षण शिबिर यंग ब्लड फुटबॉल क्लबने आयोजित केले आहे. या शिबिरात ६ ते १९ वर्ष वयोगटातील १३५ मुले फुटबॉलचे धडे गिरवित आहे. मुलांनी मोबाईल आणि टी.व्ही.पासून विद्यार्थ्यांना दूर ठेवून मैदानाशी नाते जुळवावे, हा शिबिर आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे. देशाची भावी पिढीचे शरीर तंदुरू स्त राहून मन बळकट होण्याकरिता व्यायामासोबतच ध्यानधारणा करणे शिकविण्यात येत आहे. तसेच सकस आहाराबाबतचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. जागतिक स्तरावर भारताने फुटबॉलमध्ये नावलौकिक करावे, याकरिता शिबिरातून उच्चस्तर खेळाडू निर्माण करण्याचा संकल्प यंग फुटबॉल क्लबच्या प्रशिक्षकांचा मानस आहे.वरिष्ठ फुटबॉल प्रशिक्षक अब्दुल सत्तार कुरेशी शिबिरार्थींकडून व्यायाम करवून घेतात. तसेच शिस्तीचे धडे देतात. तसेच फुटबॉलमधील आधुनिक तंत्रज्ञान आणि तंत्रशुद्ध कसे खेळायचे, याबाबत प्रशिक्षक अन्जार अहमद कुरेशी प्रशिक्षण देत आहेत. शिबिरामध्ये प्रशिक्षणार्थींना नियमित नास्ता आणि पौष्टिक आहार देण्यात येतो. शिबिर सकाळी ६ ते ८ यावेळेत घेण्यात येते. सावित्रीबाई फुले कन्या शाळा (गर्व्हनमेंट गर्ल्स स्कूल)मैदान येथे शिबिर सुरू असून, इच्छुकांना प्रवेश देणे सुरू आहे. शिबिर संपूर्णपणे नि:शुल्क आहे. शिबिराला अकोला जिल्हा फुटबॉल संघटनेचे सय्यद जावेद अली, नितीन देशमुख, अनिल बाजोरिया यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाFootballफुटबॉलSportsक्रीडा