शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मूर्ख संमेलनाची सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2017 02:32 IST

अकोल्यात एकमेव होणारे संमेलन; यावर्षी निवडणूक व मतदान विषय राहणार.

अकोला, दि. ९- संपूर्ण राज्यात सुमारे ४५ वर्षांंपासून अविरत धूलिवंदनाच्या दिवशी आयोजित होणारे अकोल्यातील मूर्ख संमेलन सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे. यावर्षी मूर्ख संमेलनात मतदान व निवडणूक हा विषय प्रामुख्याने राहणार आहे. स्थानिक कलाकार या मूर्ख संमेलनात आपली कला सादर करणार असल्याची माहिती मूर्ख संमेलनाचे मूर्खाधिराज विकास शर्मा यांनी दिली.शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत शर्मा यांनी ४५ वर्षांंची मूर्ख संमेलनाची परंपरा सांगितली. धूलिवंदन हा समाजाचा होळी पर्वावर येणारा सामाजिक उपक्रम आहे. या पर्वावर रंग खेळून उत्सव साजरा करतात; मात्र खोलेश्‍वर येथील स्वातंत्र्यसैनिक तथा नगरसेवक डॉ. प्रभुदयाल शर्मा यांनी आपले पत्रकार मित्र रामकिशोर श्रीवास यांना सोबत घेऊन ४५ वर्षांंपूर्वी धूलिवंदनाच्या रंगात्मक खेळाला छेद देत अकोल्यात मूर्ख संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली. त्या काळी याला ह्यअभिनव विधानसभाह्ण हे नाव देण्यात आले होते. धूलिवंदनाच्या सायंकाळी तेव्हाच्या कॉटन मार्केट येथे हे विचार व प्रबोधनाचे व्यंगात्मक विधानसभा अधिवेशन भरविले जात होते. त्यामध्ये आमदार, खासदार, मंत्री वर्गाचे व्यंगात्मक व मनोरंजनात्मक कामकाजाचे सादरीकरण करण्यात येत होते. सभा संपल्यावर पुढील वर्षाच्या धूलिवंदन कार्यक्रमापर्यंंत हे अधिवेशन तहकूब केल्या जात होते. कालांतराने हे कामकाज स्वराज्य भवनाच्या प्रांगणात आणण्यात येऊन त्याचे नामकरण ह्यमूर्ख संमेलनह्ण करण्यात आले. हे संमेलन अल्पावधीतच लोकप्रिय झाले. तत्कालीन खासदार असगर हुसेन, भु.ना. मुखर्जी, बाबा कोथळकर, शंकरराव खंडारे, कामगार नेते मधुकरराव उतखडे, ओ.पी. मिश्रा, मामा पांडे, मोहनलाल छावछरिय, रामेश्‍वर अग्रवाल, बाजीराव पाटील, पन्नालाल शर्मा, बळीराम चापळे, देवराव लोटे, मीणा उदासी, लक्ष्मणसिंग जाजोरिया आत्माराम डोंगरे, प्रा.नरेंद्र पुरोहित तसेच कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार, शाहीर वसंतराव मानवटकर यांच्यासमवेत लोक प्रतिनिधी, कला साहित्य व शिक्षण क्षेत्रातील गणमान्यांचा सहभाग दरवर्षीची बाब झाली होती, असेही शर्मा यांनी सांगितले.