शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अन्न प्रक्रीया निर्मिती, निर्यात अकोल्यातून शक्य -  सुनिता फाल्गुने  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 18:51 IST

अकोला : प्रगतशील शेतकरी आणि उद्योजकांची चिकाटी अशीच राहिली तर अन्न प्रक्रीया निर्मिती निर्यात अकोल्यातून शक्य आहे, असा विश्वास महाराष्ट्र चेंबर कृषी प्रक्रीयेतील नाशिकच्या तज्ज्ञ सुनिता फाल्गुने यांनी व्यक्त केला.

-  संजय खांडेकरअकोला : प्रगतशील शेतकरी आणि उद्योजकांची चिकाटी अशीच राहिली तर अन्न प्रक्रीया निर्मिती निर्यात अकोल्यातून शक्य आहे, असा विश्वास महाराष्ट्र चेंबर कृषी प्रक्रीयेतील नाशिकच्या तज्ज्ञ सुनिता फाल्गुने यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर मुंबई आणि अकोला इंडस्ट्रीज असोसिएशच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक औद्योगीक वसाहतीत अन्न प्रक्रीय अद्योगासंदर्भात एक दिवसीय चर्चासत्र मंगळवारी पार पडले. लोकमतने त्यांच्याशी साधलेला विशेष संवाद.प्रश्न : अन्न प्रक्रीया निर्मिती आणि निर्यात अकोल्यातून कशी होईल ?उत्तर : मंगळवारच्या चर्चासत्रातून अकोल्यात अनेक तज्ज्ञ आणि प्रयोगशील कास्तकार असल्याचे समोर आले आहे. केसर आंबा, काजू, आवळा, मोसंबी, चीक्कू, रामफळ, सीताफळ, जांभूळ ,डाळींब, केळी आदी विविध फळांच्या पीकांचे उत्पादन अकोल्यात होते. या पीकांसोबत काही शेतकऱ्यांनी अन्न प्रक्रीया साखळी निर्मिती सुरू केली आहे. अशा शेतकरी-उद्योजकांच्या उत्पादनाला आंतराष्ट्रीय बाजारपेठ मिळू शकते. मुंबई, पुणे आणि नाशिकच्या अनेक कंपन्यांची सांगड करून दिली तर अकोल्यातून निर्यात शक्य आहे.प्रश्न : महाराष्ट्र चेंबरचा प्रयोग उद्योजकांसाठी कि शेतकऱ्यांसाठी आहे ?उत्तर : शेतकरी आणि उद्योजक एकमेकांना पुरक कार्य करीत असतात. परंपरागत शेतीचे दिवस आता नाही. त्यामुळे अनंत समस्या निर्माण होत आहे. प्रगतशील शेती आणि अन्न प्रक्रीया साखळी निर्मितीकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिल्यास ते उद्योजक होऊ शकतात. किंवा उद्योजकांसाठी शेतकºयांचे उत्पादन महत्वाची कामगिरी पार पाडू शकते. शेतकरी आणि उद्योजक दोघांच्या एकंदरीत विकासासाठी महाराष्ट्र चेंबरचा हा प्रयोग सुरू आहे.प्रश्न : योजनांचा लाभ मिळत नाही अनेकांना मिळत नाही कारण काय ?उत्तर : उद्योजक आणि शेतकºयांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना अस्तीत्वात येत आहे. मात्र अनेकदा या योजनांची माहिती तळागाळात जात नाही. शोषण सुरू होते. त्यासाठीच भविष्यात नॉलेज सेंटर उभारले जाणार आहे. यामुळे मानसिकतेत बदल तर होऊलच सोबतच नव्या बाजारपेठा आणि बदल शेतकरी आणि उद्योजकांना कळेल. अनेक उद्योगांमध्ये व्हॅल्यू एडीशन होत नसल्याने ते उद्योग बंद पडत आहे, त्यांना संजीवणी मिळेल.प्रश्न : कृषी आणि उद्योगसंदर्भातील तांत्रिक अडचणी कश्या दूर होतील ?उत्तर : कृषी आणि उद्योजकांना नेहमीच तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. मातीचे परीक्षण, अन्न प्रक्रीया साखळी निर्मितीचे नमुने यासाठी प्रयोगशाळांचे अहवाल आवश्यक असतात. अकोल्यातील कृषी विद्यापीठाच्या प्रमुखांकडे जाऊन या सेवा आम्हाला द्या म्हणून शेतकºयांनी आवाज उठविला पाहिजे. तांत्रीकबाबी देखिल भविष्यात नॉलेज सेंटरच्या माध्यमातून यातील तज्ज्ञांना पाचारण करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहेत.प्रश्न : सबसीडीच्या लाभासाठीच उद्योग उघडले जातात का ?उत्तर : अनेकजण केवळ सबसीडीच्या साठी उद्योग उघडतात, मात्र तसे सर्व नाही. अनेक उद्योजकांवर कर्जही होत असते. उद्योगांना उभारी देण्यासाठी महाराष्ट्र चेबरचे प्रयत्न सुरू आहे. राज्यात प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही अन्न प्रक्रीया साखळीचे नवे उद्योग उभारण्याचा उपक्रम हाती घेत आहोत. त्यात शासनाची सबसीडी आॅक्सीजन देते.

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत