शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

३० लाखांचा गुटखा तडकाफडकी जाळला; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 13:49 IST

अकोला: पोलिसांनी केलेल्या कारवायातील गुटख्याचा साठा अन्न व औषध प्रशासनाने दुसऱ्याच दिवशी एमआयडीसी परिसरात नेऊन तडकाफडकी जाळला. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी पकडलेला गुटखा लगेच दुसऱ्या दिवशी जाळल्याची प्रथमच ही कारवाई साहायक आयुक्त लोभसिंह राठोड, निरीक्षक रावसाहेब वाकडे यांनी केली.

अकोला: पोलिसांनी केलेल्या कारवायातील गुटख्याचा साठा अन्न व औषध प्रशासनाने दुसऱ्याच दिवशी एमआयडीसी परिसरात नेऊन तडकाफडकी जाळला. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी पकडलेला गुटखा लगेच दुसऱ्या दिवशी जाळल्याची प्रथमच ही कारवाई साहायक आयुक्त लोभसिंह राठोड, निरीक्षक रावसाहेब वाकडे यांनी केली.आयपीएस अधिकारी भांबरे आणि एमआयडीसी पोलिसांनी एमआयडीसीतील गोडावूनमधून ३५ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला होता. या प्रकरणी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून गुटख्याचा साठा नष्ट करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने ही जोरदार कारवाई करीत गुटखा माफियांना दणका मोठा दणका दिला आहे. पोलिसांना अधिकार नसताना छापेमारीउच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या एका याचिकेनंतर न्यायालयाने पोलिसांना गुटखा जप्त करण्याचे अधिकार नसल्याचे स्पष्ट केले होते. गुटखा साठ्यावर छापेमारी करण्याचे अधिकारही पोलिसांना नसल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. पोलिसांना माहिती मिळाली तर त्यांनी ही माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला देऊन त्यांना सोबत घेतल्यानंतरच कारवाई करण्याच्या सूचना न्यायालयाने दिलेल्या आहेत; मात्र त्यानंतरही अकोला पोलिसांची गुटखा साठ्यावर छापेमारी सुरूअसून, यामधून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. गुटखा माफियांवर कारवाई का नाही?दोन दिवसात तब्बल ३० लाख रुपयांचा गुटखा जप्त केला असला तरी पोलीस किंवा अन्न व औषध प्रशासन विभागाने अद्याप या गुटख्याचा खरा मालक शोधला नसल्याने संशय निर्माण होत आहे. या ठिकाणचा गुटखा पोलिसांनी जप्त केला असून, नेमका मालक कोण आहे, हे स्पष्ट केले नाही, गोदाम भाड्याचे असल्यामुळे शोध लागत नसल्याचे हास्यास्पद उत्तर देण्यात येत असून, दोन ट्रक गुटखा ज्या गोदामातून जप्त केला त्याच्या मालकांना पोलीस व अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडूनच अभय मिळत आहे. हैद्राबादमध्ये दिलीपचे कनेक्शनएका ट्रेडर्सचा मालक असलेला दिलीप हा जिल्ह्यातच नव्हे तर वाशिम व बुलडाण्यातील गुटखा माफियांना विविध कंपन्यांचा गुटखा पोहोचविण्याचे काम करीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दिलीप हैद्राबादमध्ये मोठ्या कंपनीच्या संपर्कात असून, त्या ठिकाणावरून ट्रकने गुटखा आणणे आणि त्याची या तीन जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या माफियांमार्फत विक्री करण्याचे काम करीत आहे. दिलीपने आता जिल्ह्यात नवीन जोडगोडी तयार केली असून, त्यांच्या माध्यमातूनच गुटख्याची मोठी उलाढाल सुरू असल्याची चर्चा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग