शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम लीग पाठोपाठ यूडीएफनेही मनपा निवडणुकीचे मैदान सोडले

By admin | Updated: February 4, 2017 02:28 IST

उमेदवार रिंगणात नाहीत; पक्ष कार्यकर्त्यांंचा पाठिंबा कुणाला हा प्रश्न शेष.

अकोला, दि. 0४- मुस्लीम लीगच्या पाठोपाठ आता यूडीएफनेही अकोला महापालिका निवडणूक मैदान सोडले आहे. मुस्लिम समजाची पकड असलेले हे दोन्ही पक्ष आता कोणाच्या पाठीशी उभे राहतात, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागून आहे.अकोला महापालिके त मागील निवडणुकीत दोन नगरसेवकांना विजयी करणार्‍या यूडीएफनेही यंदा मैदान सोडले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंंतही यूडीएफने आपले उमेदवार घोषित केले नाही. याबाबत यूडीएफचे प्रमुख मुफ्ती अशपाक कासमी यांना विचारणा केली असता, यंदा आम्ही निवडणूक लढविणार नसल्याची माहिती त्यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलतांना दिली. यूडीएफच्या उमेदवारीवर ईमॅन्युअल हक कुरेशी यांची पत्नी आणि फैयाज खा यांची आई मागील महापालिका निवडणुकीत निवडून आल्या होत्या, तर डब्बूसेठ आणि गुड्ड नामक यूडीएफच्या उमेदवारांनी इतर पक्षांच्या उमेदवारांच्या नाकीनऊ आणले होते. त्यामुळे मुस्लीमबहुल प्रभागात यंदाही यूडीएफ निवडणूक मैदानात ताकदीनिशी उतरण्याची शक्यता होती; मात्र यूडीएफने अचानक माघार घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त केल्या जात आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या चरणात सर्व राजकीय पक्षांनी आपल्या पक्षांचे उमेदवार जाहीर केले; मात्र यूडीएफने शेवटच्या दिवशीही चुप्पी साधली आहे. याबाबत जेव्हा अशपाक यांना बोलते केले असता, त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. दरम्यान, मागे यूडीएफच्या नावाने ज्यांनी निवडणूक लढविली होती, त्यापैकी फैयाज खॉ यांनी राष्ट्रवादीचा तर कुरेशीने एमआयएमचा हात धरला आहे. मुस्लीम लीगच्या पाठोपाठ यूडीएफ नेही निवडणूक मैदान सोडल्याने महापालिकेच्या मुस्लीमबहुल आठ प्रभागांत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची शक्ती वाढली आहे. आता एमआयएमचे उमेदवार या पक्षांची ताकद किती क्षीण करतात, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागून आहे.