शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चारा महागला, मुक्या जिवांचे बेहाल!

By admin | Updated: January 26, 2015 01:11 IST

पश्‍चिम व-हाडातील चित्र ; पशुपालकांनी पशुधन काढले विक्रीला.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा):पश्‍चिम वर्‍हाडात अपुर्‍या पावसामुळे दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. पाणी व चार्‍याची टंचाई आतापासूनच जाणवत असल्याने जनावरांचा चारा महागला आहे. दुष्काळाच्या या फटक्यामुळे जनावरांचे बेहाल होत आहेत. पश्‍चिम वर्‍हाडातील बुलडाणा, अकोला व वाशिम जिल्ह्यात गतवर्षी गारपिट व अवकाळी पाऊस झाल्याने, शेतकर्‍यांनी शेतात साठवून ठेवलेल्या चार्‍याची नासाडी झाली होती. शेतात असलेल्या सोयाबीन व इतर कुटाराला बुरशी लागून, ते कुटारही खराब झाले होते. यंदाच्या पावसाळ्यात अपुरा पाऊस पडल्याने पश्‍चिम वर्‍हाडावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. या दुष्काळाचा फटका आता मुक्या जनावरांनाही बसू लागला आहे. शेतकर्‍यांकडे चारा उपलब्ध नसल्याने जनावरांची रानोमाळ भटकंती सुरू झाली असून, पशुधन वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची तारांबळ उडत आहे. अकोला जिल्ह्यात २ लाख ७७ हजार ८८१, वाशिम जिल्ह्यात ३ लाख ४ हजार ३४७ तर बुलडाणा जिल्ह्यात १0 लाख १३ हजार ६८८ जनावरे आहेत. मोठय़ा जनावराला सुमारे ७ किलो, तर छोट्या जनावराला ३ किलो कोरडा चारा दिवसाकाठी लागतो. पश्‍चिम वर्‍हाडातील पशुपालकांनी साठवून ठेवलेला चारा संपल्याने इतर जिल्ह्यांतून चारा खरेदी केला जात आहे. या चार टंचाईचा गैरफायदा घेत ज्याच्याकडे थोड्या बहुत प्रमाणात चारा शिल्लक आहे; त्यांनी चार्‍याच्या किंमती वाढवून ठेवल्या आहेत. परिणामी, अनेक पशुपालकांनी त्यांची जनावरे विक्रीस काढली आहेत.