शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अकोला रेल्वेस्थानकावर उभारला जातोय साडेतीन कोटींचा 'एफओबी रॅम्प'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 14:09 IST

अकोला: मॉडेल रेल्वेस्थानक म्हणून नावलौकिक मिळत असलेल्या अकोला रेल्वेस्थानकावर साडेतीन कोटी रुपये खर्च करून १८ फूट रुंदीचा नवा भव्य एफओबी रॅम्प उभारला जात आहे.

अकोला: मॉडेल रेल्वेस्थानक म्हणून नावलौकिक मिळत असलेल्या अकोला रेल्वेस्थानकावर साडेतीन कोटी रुपये खर्च करून १८ फूट रुंदीचा नवा भव्य एफओबी रॅम्प उभारला जात आहे. या एफओबीच्या कामास प्रारंभ झाला असून, लवकरच तो पूर्णत्वास येणार असल्याचे संकेत आहे. यासोबतच अकोला रेल्वेस्थानक परिसरात स्वयंचलित जिन्याचे बांधकामही लवकरच सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.आरओबी कोसळल्याच्या घटनेनंतर देशभरातील जुन्या आरओबींचे सर्व्हे रेल्वे विभागातर्फे करण्यात आले. त्यात अकोला रेल्वेस्थानकावर ब्रिटिशकालीन ब्रिजला ८० वर्ष झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे अकोला रेल्वेस्थानकावरील तिकीटघरालगत असलेला जुना ब्रिज पाडून नवा एफओबी रॅम्प उभारण्याचे निर्देश मध्य रेल्वे मंडळाने दिले. त्यानुसार अकोला स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक २-३, आणि ४-५ वर १२ बाय १२ चे मोठे खड्डे खोदल्या गेले आहेत. १४० मीटर लांबीच्या या एफओबीला साडेतीन कोटींच्या खर्चांतून उभारले जात असून, आठ महिन्यात हे बांधकाम पूर्ण होणार असल्याचे एडीआरएम मनोजकुमार यांनी सांगितले. १८ फूट रुंद असलेल्या या एफओबी रॅम्पचे बांधकाम संपूर्णपणे लोखंडी गडरने होणार आहे. अद्यावत आणि मजबूत भार क्षमतेचा हा ब्रिज राहणार असल्याचे बोलले जात आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे बांधकाम सुरू आहे. मंदिराजवळील एफओबीचादेखील विस्तारनवीन एफओबीच्या उभारणीसोबतच हनुमान मंदिराजवळील ९९-२००० मध्ये उभारलेल्या ब्रिजचा विस्तारही केला जाणार आहे. लिफ्टशी जोडलेल्या या ब्रिजवरून आधी प्लॅटफॉर्म क्रमांक ५ पर्यंतच जाता येत असे; मात्र नवीन विस्तारात हा ब्रिज आता प्लॅटफार्म क्रमांक ६ आणि ७ ला जोडला जाणार आहे. त्यामुळे अकोट फाइलच्या दक्षिणमध्य रेल्वेस्थानकाशी जुळणार आहे. नांदेड मध्य रेल्वे मंडळाच्या अधिकाºयांनी नुकताच याला मंजुरी दिली असून, त्या कामालादेखील लवकरच सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक