शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

पाच वर्षांपासून महिला व बाल कल्याणची योजना कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 12:51 IST

अकोला: मागील पाच वर्षांपासून महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाची योजना राबविण्यात सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी सपशेल अपयशी ठरले आहेत.

अकोला: मागील पाच वर्षांपासून महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाची योजना राबविण्यात सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी सपशेल अपयशी ठरले आहेत. २०१४ पासून ते आजपर्यंत तरतूद केलेल्या कोट्यवधींच्या निधीतून पात्र महिलांना शिलाई मशीन तसेच मनपाच्या शाळकरी मुलींना सायकलचे वाटप झाले नसल्याची माहिती आहे. संबंधित विभागावर खापर फोडून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकरणी शिवसेना व भारिप-बमसंने आक्षेप नोंदविला असला तरी विरोधी पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक चुप्पी साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.शहरातील गरजू महिलांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शिलाई मशीन तसेच महापालिकेच्या शाळेतील गोरगरीब विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यासाठी मनपातील महिला व बाल कल्याण विभागामार्फत दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाते. मनपाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या निधीचा लाभ देण्यात सत्ताधारी भाजपाला मागील पाच वर्षांपासून अपयश आले आहे. २०१७ मध्ये महापालिकेत एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपच्या कालावधीत या विभागामार्फत राबवल्या जाणाºया योजनांचा पात्र व गरजू लाभार्थींना नक्की लाभ मिळेल, असा आशावाद निर्माण झाला होता. या ठिकाणी नेमके उलटे चित्र समोर आले आहे. महिलांना भेडसावणाºया समस्यांची जाण व अभ्यासू अशी ओळख असणाºया महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सारिका जयस्वाल यांना महिला व बाल कल्याण अधिकारी रंजना घुले यांना नोटशिट लिहिता येत नसल्याचा साक्षात्कार दोन वर्षांनंतर झाला. याप्रकरणी स्थायी समिती असो वा मनपाच्या मुख्य सभागृहात शिवसेना व भारिप-बमसंने सातत्याने आक्षेप नोंदविल्यानंतरही सत्ताधारी भाजपाने पात्र लाभार्थींना योजनांचा लाभ दिला नाही, हे येथे उल्लेखनीय.कोट्यवधींच्या निधीचा वापरच नाही!२०१३-१४- १ कोटी रुपये२०१४-१५- २ कोटी२०१५-१६- १ कोटी२०१६-१७- १ कोटी ३० लक्ष२०१७-१८- १ कोटी ५० लक्ष२०१८-१९- २ कोटी ३६ लक्ष२०१९-२०- ३ कोटी २५ लक्षआयुक्तांच्या भूमिकेकडे लक्षअर्थसंकल्पात दरवर्षी या विभागाकरिता कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. प्रशासनाने चालू आर्थिक वर्षासाठी ३ कोटी २५ लाखांची तरतूद केली आहे. या निधीचा गरजू लाभार्थींना लाभ मिळावा या प्रामाणिक उद्देशातून प्रशासनाकडून ठोस प्रयत्नांची गरज असून, महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस हतबल; राष्ट्रवादीची चुप्पीशहरातील गरजू व पात्र महिलांना शिलाई मशीन व मनपाच्या शाळकरी मुलींना सायकल वाटप करण्यात अपयशी ठरलेल्या महिला व बाल कल्याण विभागासह सत्ताधारी पक्षाला जाब विचारण्याची जबाबदारी अकोलेकरांनी विरोधी पक्ष या नात्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर सोपवली आहे. विरोधी पक्षनेता साजिद खान व राष्ट्रवादीच्या गटनेत्या शीतल गायकवाड यांनी आजपर्यंत या विषयावर चकार शब्दही काढला नसल्याने मनपात विरोधी पक्ष कमालीचा हतबल असल्याचे चित्र समोर आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका