शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

सोन्याची पोत चोरणाऱ्या पाच महिलांच्या टोळीस अटक

By admin | Updated: July 6, 2017 19:50 IST

बोरगाव मंजू बसस्थानकावर झाली चोरी : आॅटोचालकाच्या प्रसंगावधानाने मुद्देमाल जप्त

बोरगाव मंजू : स्थानिक बसथांब्यावर बसमध्ये एक प्रवासी महिला चढत असताना सदर महिलेच्या पर्समधून १ लाख २५ हजार रुपये किमतीची ४२ ग्रॅम वजनाची सोन्याची पट्टा पोत लंपासकरणाऱ्या पाच महिलांच्या टोळीला बोरगाव मंजू पोलिसांनी मुद्देमालासह मोठ्या शिताफीने अटक केली. सदर पाचही महिलांविरुद्ध पोलिसांनी रात्रीच गुन्हा दाखल केला. ही घटना बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली होती. मूळचे डोंगरगाव येथील रहिवासी सोमेश्वर नागापुरे हे त्यांच्या गावावरून अमरावती येथे जाण्यासाठी त्यांच्या पत्नी उषा नागापुरेसह बोरगाव मंजू बसथांब्यावर आले होते. तेथून बसमध्ये बसत असता पाच महिलासुद्धा बसमध्ये बसण्याचा प्रयत्न करीत होत्या. सदर महिलांनी बसमध्ये चढताना दोघी उषा नागपुरेच्या पुढे व तिघी मागे चढल्या. बसमध्ये चढत असताना त्यांनी उषा नागापुरेंच्या पर्समध्ये ठेवलेली १ लाख २५ हजार रुपये किमतीची ४२ ग्रॅम सोन्याची पट्टा पोत व रोख ९०० रुपये असा मुद्देमाल अलगद चोरला. त्यानंतर सदर पाचही महिला सदर बस त्यांच्या कामाची नाही म्हणून खाली उतरल्या. सदर बस काटेपूर्णाकडे जात असताना उषा नागापुरे यांनी पर्स पाहिली असता सोन्याची पट्टा पोत गायब झाल्याचे दिसून आले. त्यांनी बस काटेपूर्णा येथे थांबवून खाली उतरल्या. खासगी आॅटोने पोलीस स्टेशन गाठून सदर तक्रार ठाणेदार पी. के. काटकर यांच्याकडे दाखल केली. त्या तक्रारीवरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार काटकरसह हे.काँ. धांडे, इंगळे, पवार, माधवी बन्सोड यांनी बसथांब्यावर धाव घेतली. माहितीच्या आधारे सदर महिला एमएच ३० पी ७७५८ क्रमांकाच्या प्रवासी आॅटोने मूर्तिजापूरकडे जात होत्या. दरम्यान, सदर आॅटोचालक रशीदशहा यांच्याही हा प्रकार लक्षात आला होता. त्यांनी त्याचा मित्र आॅटोचालक मो. वाजीद यांना सदर माहिती सांगितली. मो. वाजीदने सदर माहिती पोलिसांना दिली. त्यावरून सदर आॅटोला काटेपूर्णा बसथांब्यावर पकडून पाचही महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता सदर सोन्याची पट्टा पोत व नगदी नऊशे रुपये मिळून आले. दरम्यान, घटनेच्या फिर्यादीवरून पूनम हातगडे, राणी नाळे, रेखा हानागडे, नंदा नाळे, उषा उकाळे सर्व रा. यवतमाळ यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध ३७९, ३४ भादंवि गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार पी. के. काटकर करीत आहेत.