अकोला: कृषी विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला (एम.एस्सी. सीईटी) प्रवेश मिळवण्यासाठी विदर्भातील वेगवेगळ्य़ा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परीक्षेत विदर्भातील ५ हजार ४ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यामध्ये सर्वाधिक २,८९९ विद्यार्थ्यांनी कृषी विषयासाठी परीक्षा दिली.कृषी अभ्यासक्रमात एम.एस्सी.ला प्रवेश घेण्यासाठी राज्यात सीईटी परीक्षा सुरू करण्यात आली आहे. तेव्हापासून राज्यात सीईटीनंतरच विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जात आहे. रविवारी शेवटच्या दिवशी विदर्भातील अकोला, नागपूर, यवतमाळ व गडचिरोली येथील केंद्रांवर सीईटी घेण्यात आली. अकोला येथील केंद्रावर २,९२५ विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी प्रवेशपत्र भरले होते. त्यापैकी विविध अभ्यासक्रमाच्या १२७ विद्यार्थ्यांची अनुपस्थिती होती. प्रत्यक्षात २,७९८ विद्यार्थ्यांंनी परीक्षा दिली. यामध्ये कृषी जैवतंत्रज्ञान विषयातील १४२, कृषी अभियांत्रिकीचे ६४, कापणीपश्चात तंत्रज्ञान ६७, कृषिव्यवसाय व्यवस्थापन ३३0, उद्यानविद्याशास्त्र ५९३, अन्न तंत्रज्ञान ९, वनशास्त्र ८७, तर सर्वाधिक कृषी विषयासाठी १५0७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.नागपूर येथील केंद्रावर एकूण १९८७ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली. यात १,२२0 विद्यार्थ्यांंनी कृषी एम.एस्सी. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी परीक्षा दिली तसेच उद्यानविद्याशास्त्र २९४, कृषिव्यवसाय व्यवस्थापनाच्या ३0३ विद्यार्थ्यांंसह वनशास्त्र ३५, कृषी अभियांत्रिकी ८, मत्स्यशास्त्र ९, अन्न तंत्रज्ञान १८, कापणीपश्चात तंत्रज्ञान ३0 आदी विषयांच्या विद्यार्थ्यांंनी परीक्षा दिली. यवतमाळ येथील केंद्रावर कृषी अभ्यासक्रमाच्या १६२ विद्यार्थ्यांंनी, तर गडचिरोली येथे कृषी अभ्यासक्रमाच्या ५७ विद्यार्थ्यांंनी परीक्षा दिली. विदर्भातील सर्व ठिकाणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने परीक्षा घेतली. अकोला येथे कृषी महविद्यालयाचे सहयोगी कृषी अधिष्ठाता डॉ. एस.एस. माने व वरिष्ठ परीक्षक म्हणून उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे यांनी कामकज बघितले. नागपूर येथे नागपूर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलास खर्चे, यवतमाळ येथील सीईटीचे काम स्व. वसंतराव नाईक जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर.एम. गाडे यांनी सीईटीची जबाबदारी पार पाडली.
पाच हजारांवर विद्यार्थ्यांनी दिली कृषी एम.एस्सी.साठी पूर्वपरीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2016 01:45 IST