शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

अकाेला जिल्ह्यातील गुंडांच्या पाच टाेळ्या दाेन वर्षांसाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 10:46 IST

Crime News : ५ टाेळ्यांना दाेन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले असून एका गुंडास कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे़.

अकाेला : उपद्रवी तसेच समाजकंटक दाेन समाजात, दाेन गटात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात़ या उपद्रवींचा बंदाेबस्त करण्यासाठी पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर यांनी कंबर कसली असून जिल्ह्यातील अशा गुंडांच्या तब्बल ५ टाेळ्या दाेन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आल्या आहेत़.

माना पाेलीस स्टेशनच्या हद्दीतील रहिवासी तसेच जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर टाेळीने गुन्हे करणारे मोहम्मद नईम अब्दुल सिद्दिकी वय ३२ वर्षे रा़ कुरुम, मोहम्मद सोहेल अब्दुल मसूद, वय ३० वर्षे, रा. कुरुम या दाेन जणांना दाेन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे़.

आकाेट फैल पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेले व जिल्हाभर गुंडगिरी करणारे शोयब बेग अजहर बेग, वय २४ वर्षे रा. रामदास मठ, अकाेट फैल, शेख सोहेल खान शेख युसूफ वय २२ वर्ष रा़ भारत नगर, शेख रेहान कुरेशी युसुफ कुरेशी वय २४ वर्ष रा़ सोळाशे प्लॉट या तीन गुंडांना जिल्ह्यातून दाेन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे़.

सिव्हील लाइन्स पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी तसेच टाेळीने गुंडगिरी करणारे रवी बापुराव इंदाने वय ४७ वर्ष रा़ जुने शहर, शामसुंदर श्रीधर देशपांडे वय ५२ वर्ष रा़ लक्ष्मीनगर माेठी उमरी या दाेन गुंडांना दाेन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे़ या तीनही टाेळ्यातील सात गुंडांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे़.

तेल्हारा पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी तसेच कुख्यात गुंडांच्या टाेळीतील निखील श्रीकृष्ण अग्रवाल वय २७ वर्ष रा. खेलदेशपांडे ता. तेल्हारा, नितीन निरंजन गवारगुरु वय ३० वर्ष रा़ उबारखेडे ता. तेल्हारा या दाेघांना जिल्ह्यातून दाेन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे़.

बाळापूर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत टाेळीने गुन्हे करणारे निवृत्ती राजेंद्र म्हैसने वय ३२ वर्ष रा़ वाडेगाव व योगेश मुरलीधर केकण वय २४ वर्ष, चिंचोलीगण ता. बाळापूर या दाेन गुंडांना जिल्ह्यातून दाेन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे़.

आगामी काळात कावड पालखी महाेत्सव, माेहरम, नवरात्राेत्सव, गणेशाेत्सव, तसेच विविध सण, उत्सव लक्षात घेता पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर यांनी गुन्हेगारांवर अंकुश मिळविण्यासाठी उपाययाेजना सुरू केलेल्या आहेत़ त्याअंतंर्गत आतापर्यंत ५ टाेळ्यांना दाेन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले असून एका गुंडास कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे़.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी