शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा उमेदवाराच्या घरातून पाच डमी ईव्हीएम जप्त !

By admin | Updated: February 22, 2017 02:43 IST

उमेदवार सुजाता अहीरसह पतीविरुद्ध गुन्हा दाखल

अकोला, दि. २१-मतदान आटोपल्यानंतर मंगळवारी सायंकाळी प्रभाग १३ मधील भाजपाचे उमेदवार सुजाता देवराव अहीर यांच्या निवासस्थानी पोलिसांनी छापा टाकून पाच डमी ईव्हीएम जप्त केल्या. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी छापा टाकून ही कारवाई केली असून भाजपा उमेदवार सुजाता अहीर आणि त्यांचे पती देवराव अहीर यांच्याविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी सखोल चौकशी सुरू केली आहे.महापालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असताना परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील या प्रभाग १५ मधून जात असताना त्यांना भाजपाचे उमेदवार सुजाता देवराव अहीर यांच्या घरी गर्दी दिसली. त्यांनी नागरिकांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. दरम्यान, याचवेळी उमेदवार पती देवराव अहीर तिथे आले. अहीर यांनी प्रिया पाटील यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला असता या ठिकाणी काही काळ खडाजंगी झाली. या प्रकारामुळे त्यांनी अतिरिक्त पोलिसांची कुमक बोलावून त्यांच्या घराची झडती घेतली. या झडतीमध्ये पाच डमी ईव्हीएम मिळून आल्या. यासंदर्भात पोलिसांनी अहीर यांची विचारणा केली असता त्यांच्याकडून सर्मपक उत्तर देण्यात आले नाही. मोठय़ा प्रमाणात घरासमोर गर्दी जमवून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यानंतरही पोलिसांशी उर्मट भाषेत संभाषण केल्याने तसेच डमी ईव्हीएम मशीन मिळाल्याने भाजपा उमेदवार सुजाता अहीर आणि त्यांचे पती देवराव अहीर यांच्याविरुद्ध सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ नुसार जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनीही पोलीस स्टेशन गाठून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच आमदार रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी सदर प्रकरणाबाबत पोलिसांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

  अहीर यांच्या घरासमोर बेकायदेशीर मंडळी जमविण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन या ठिकाणी सुरू असताना पोलिसांनी त्यांना विचारणा केली; मात्र अहीर यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे.- विजयकांत सागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक