शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

दिवसभरात पाच जणांचा मृत्यू; १४६ नवे पॉझिटिव्ह, २० कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 18:24 IST

शनिवार १९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील आणखी पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा २०८ वर गेला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवार १९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील आणखी पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा २०८ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १४६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ६४२१ झाली आहे. दरम्यान, शनिवारी आणखी २० जणांना डिस्चार्ज देण्यात आलाशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३८१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४६ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २३५ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये ५४ महिला व ९२ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मुर्तिजापूर येथील २५ जणांसह, पातूर येथील १५ , पिंगळा येथील १०, डाबकी रोड येथील सहा, चान्नी ता. पातूर, लहान उमरी व जीएमसी येथील प्रत्येकी पाच, मोठी उमरी, सिंधी कॅम्प व जठारपेठ येथील चार, गीता नगर, बार्शिटाकळी, हरिहर पेठ, सिरसो, गुसरवाडी, मलकापूर रोड येथील प्रत्येकी तीन, गौरक्षण रोड, मलकापूर, जवाहर नगर, रामदासपेठ, तेल्हारा, तोष्णीवाल लेआऊट, जूने शहर येथील प्रत्येकी दोन, कुरुम, रामदास प्लॉट, खेमका सदन जि.प., दिग्रस बु., पीकेव्ही, खामखेड ता.पातूर, शिर्ला ता.पातूर, अकोट फैल, काटेपूर्णा, अकोट, कान्हेरी सरप, कौलखेड, बाजोरिया लेआऊट, बाळापूर, चोहट्टा बाजार, खदान, रमापूर, आगर, दुर्गा चौक, ब्लॅड बॅक जवळ, कॅलेक्टर कॉलनी, मानिक टॉकीज मागे, बाळापूर रोड, दुर्गा नगर, तापडीया नगर व मोबिला नगर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी मुर्तिजापूर, जीएमसी, गंगानगर, जीएमसी क्वॉर्टर व रणपिसे नगर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.चार पुरुष, एक महिलेचा मृत्यूशनिवारी आणखी पाच रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये रामदासपेठ, अकोला येथील ६४ वर्षीय पुरुष, बार्शिटाकळी येथील ७४ वर्षीय पुरुष, खामखेड, अकोला येथील ५७ वर्षीय पुरुष, गंगानगर येथील ६६ वर्षीय पुरुष व सरस्वती अपार्टमेंट, सिव्हिल लाईन येथील ६५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.१५२१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६४२१ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४६९२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २०८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १५२१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.२० जणांना डिस्चार्जशनिवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला