शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

उरळ पोलिसांच्या वाहनावर फायरिंग करणाऱ्या पाच हल्लेखोरांना अटक

By आशीष गावंडे | Updated: January 14, 2024 15:41 IST

पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांची माहिती

अकोला: उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कंचनपूर-मांजरी शिवारात रात्र गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर फायरिंग करणाऱ्या पाच हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून शस्त्र व गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्याची माहिती रविवारी पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली. 

उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कंचनपुर-मांजरी ते हातरून परिसरात ३० डिसेंबर २०२३ च्या रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना या मार्गावर दोन मोटरसायकलींवर संशयित व्यक्ती फिरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी दोन्ही मोटरसायकलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी पोलिसांच्या वाहनावर ताबडतोब फायरिंग केली. तसेच अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांच्या वाहनावर फायरिंग झाल्याच्या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली होती. अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेल्या हल्लेखोरांना पकडण्याचे अकोला पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले होते. १३ दिवसानंतरही आरोपींचा सुगावा लागत नसल्याचे पाहून आम्ही माहिती देणाऱ्यास २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

अखेर रविवारी पहाटे नखेगाव येथून पाचही हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्यात यश आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र तसेच दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांचा इतर गुन्ह्यात सहभाग आहे का? या दिशेने कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सिंह यांनी दिली.  पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, बाळापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज, 'एलसीबी' प्रमुख शंकर शेळके, आदी उपस्थित होते.

पोलिसांवरील हल्ले सहन करणार नाहीसदर आरोपी हरीण, रानडुक्कर, ससा आदी वन्यजीवांची शिकार करण्यासाठी या परिसरात फिरत होते, अशी गोपनीय माहिती 'एलसीबी' ला मिळाली. घटनेच्या दिवशीही ते शिकारीसाठीच या परिसरात फिरत होते. दरम्यान, पोलिसांवरील हल्ले कदापी खपवून घेणार नसल्याचा इशारा पोलीस अधीक्षक सिंह यांनी दिला. 

'एनसीबी' ने राबवले सर्च ऑपरेशनस्थानिक गुन्हे शाखाप्रमुख शंकर शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, दहिहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे, 'एलसीबी'चे उपनिरीक्षक गोपाल जाधव यांच्यासह २८ अंमलदारांनी शनिवारी संपूर्ण दिवस व रविवारची पहाट उजाडेपर्यंत सर्च ऑपरेशन राबविले. अखेर अश्विन गणेश मुंडे (२१), भावेश उर्फ अर्जुन रवींद्र मुंडाले (१९), अविनाश भिमराव मुंडाले (२६), योगेश रामराव मुंडाले (२६) सर्व राहणार नखेगाव तसेच सागर ज्ञानेश्वर चौके (२५) राहणार नेरधामणा या पाच जणांना अटक करण्यात आली.