शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचा पहिला ट्रिगर तीन तालुक्यांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 01:25 IST

अकोला : शासन स्तरावर दुष्काळ जाहीर करण्याचे परिमाण व परिभाषा बदलली आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत सरासरीपेक्षा ७५ टक्के पाऊस कमी असल्याने अकोल्यातील अकोला, पातूर व अकोट या तीन तालुक्यांत  दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देनव्या निकषांनुसार अहवाल तयार अकोला, पातूर, अकोटचा समावेश

राजेश शेगोकार। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासन स्तरावर दुष्काळ जाहीर करण्याचे परिमाण व परिभाषा बदलली आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत सरासरीपेक्षा ७५ टक्के पाऊस कमी असल्याने अकोल्यातील अकोला, पातूर व अकोट या तीन तालुक्यांत  दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू होण्याची शक्यता आहे. जिल्हा दुष्काळ देखरेख समितीद्वारा असा अहवाल आयुक्त कार्यालय स्तरावर पाठविण्यात आला असून, या तीन तालुक्यांमध्ये दुष्काळाचा पहिला टप्पा घोषित होण्याचे संकेत आहेत.शासन जाहीर करीत असलेली खरिपाची हंगामी, सुधारित व अंतिम पैसेवारी आणि कमी उत्पन्नावर दुष्काळ जाहीर करण्याची पद्धत होती. यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. केंद्र शासनाने आता दुष्काळ व्यवस्थापन संहिता २0१६ मध्ये दुष्काळ जाहीर करण्याचे निकष व कार्यपद्धती ठरवून दिली आहे. खरीप २0१७ पासून या निकषानुसारच दुष्काळ जाहीर करण्याचे निर्देश शासनाने ७ ऑक्टोबर रोजी दिले आहेत. त्यानुसार  दुष्काळी परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी प्रामुख्याने पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृदा आद्र्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक व पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण, सत्यापन विचारात घेऊन समित्यांचे गठन करण्यात आले आहे. यामध्ये पर्जन्यमानाशी निगडित निर्देशांक हा पहिलाच घटक आहे. या घटकामुळेच अकोल्यातील तीन तालुक्यांत दुष्काळाचा पहिला टप्पा लागू होणार आहे. 

निर्देशांकानुसार पावसाची सरासरी कमी- दुष्काळासंदर्भात हा अनिवार्य निर्देशांक आहे. यामध्ये पर्जन्यमानाचे विचलन, पर्जन्यमानातील खंड तसेच जून व जुलै महिन्यात एकूण सरासरी पर्जन्याच्या ५0 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असल्यास व जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी पर्जन्यमान ७५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास दुष्काळाची प्रथम कळ लागू होणार आहे. - पर्जन्यमानाच्या नोंदीनुसार अकोल्यात ३ ते १६ जुलै व ८ ऑगस्ट ते १८ ऑगस्टपर्यंत पावसाने दडी मारली होती. अकोटात ३ ते १२ जुलै व १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट व पातूरमध्ये ५ ते १३ जुलै व ५ ते १४ ऑगस्टपर्यंत पावसाचा खंड होता. साधरणपणे अशीच स्थिती इतर तालुक्यांची असली, तरी अकोला, अकोट व पातूर या तालुक्यात पावसाची सरासरी ही ७0 टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे हे तीन तालुके दुष्काळाच्या पहिल्या टप्यासाठी पात्र ठरत आहेत.

असे आहेत निकष दुष्क ाळाची तीव्रता ठरविण्यासाठी पर्जन्यमानासोबतच प्रभावदर्शक निर्देशांक यामध्ये वनस्पतीशी निगडित निर्देशांक, सामान्य फरक आद्र्रता निर्देशांक, वनस्पती स्थिती निर्देशांक, लागवडीखालील क्षेत्र, मृदा आद्र्रता निर्देशांक तसेच जलविषयक निर्देशांक यामध्ये भूजल पातळी निर्देशांकाचा समावेश आहे.