शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक शाखेची प्रथमच अनोखी पोस्टरबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 01:53 IST

अकोला : हिंदू बांधवांचे नवदुर्गा देवी विसर्जन, बौद्ध बांधवांचा  मोठा उत्सव धम्मचक्र प्रवर्तन दिन, मुस्लीम बांधवांचा मोहरम या  तीनही उत्सवानिमित्त शहरात होणार्‍या गर्दीमुळे वाहतूक शाखेने  पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. या मार्गाची माहिती  नागरिकांसह वाहनचालकांना व्हावी म्हणून वाहतूक शाखेने प्र थमच अनोखी पोस्टरबाजी केली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार  पाण्डेय, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या  मार्गदर्शनात ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवाहनचालकांच्या सुविधेसाठी प्रयत्नमार्गातील बदल दाखविण्याचे चांगले माध्यम

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हिंदू बांधवांचे नवदुर्गा देवी विसर्जन, बौद्ध बांधवांचा  मोठा उत्सव धम्मचक्र प्रवर्तन दिन, मुस्लीम बांधवांचा मोहरम या  तीनही उत्सवानिमित्त शहरात होणार्‍या गर्दीमुळे वाहतूक शाखेने  पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. या मार्गाची माहिती  नागरिकांसह वाहनचालकांना व्हावी म्हणून वाहतूक शाखेने प्र थमच अनोखी पोस्टरबाजी केली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार  पाण्डेय, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या  मार्गदर्शनात ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे.वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी वाहतूक शाखेचा  पदभार स्वीकारल्यानंतर अनोखे उपक्रम राबविण्यात येत आहेत.  याचाच एक भाग म्हणून शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशांना,  वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील वाहतूक  मार्गात बदल करून, त्याचे पोस्टर शहरात लावले आहेत.  पोलिसांकडून प्रवासी व वाहनचालकांच्या सुविधेसाठी  पोस्टरबाजी केल्याचे हे प्रथमच झाल्याची चर्चा पोलीस खात्यात  सुरू आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जिल्हय़ासह अन्य जिल्हय़ातील  बौद्ध बांधव मोठय़ा संख्येने अकोल्यात दाखल होतात, या बौद्ध  बांधवांना अकोल्यात येताना वाहतुकीमुळे त्रास होऊ नये म्हणून  वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांच्या अनोख्या  संकल्पनेतून प्रथमच शहराच्या विविध भागात पोस्टरबाजी  करण्यात आली आहे. या पोस्टरबाजीमुळे प्रवासी व  वाहनचालकांची गैरसोय होत नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत  आहेत.

अधिकार्‍यांकडून पाहणी

धम्मचक्र प्रवर्तन दिन, मोहरम मिरवणूक असलेल्या मार्गाची  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक राकेश  कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर  पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील यांनी मार्गाची पाहणी  केली. सोबतच त्यांनी वाहतूक शाखेने राबविलेल्या  पोस्टरबाजीचेही कौतुक केले. 

पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनातून  ही अनोखी संकल्पना साकारण्यात आली आहे. यासाठी रस् त्यावर फलक लावण्यात आले आहेत. बाहेरगाव तसेच बाहेर  जिल्हय़ातील येणार्‍या नागरिकांचा त्रास टाळण्याचा वाहतूक  शाखेचा प्रयत्न आहे.- विलास पाटील, प्रमुख, वाहतूक शाखा, अकोला.