शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसात सर्वोपचार रुग्णालयात स्वच्छतेचे धिंडवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 15:00 IST

अकोला: रविवारी मान्सूनचा पहिलाच दमदार पाऊस झाल्याने अकोलेकरांना दिलासा मिळाला; पण याच पावसात सर्वोपचार रुग्णालयातील स्वच्छतेचे धिंडवडे निघाले.

अकोला: रविवारी मान्सूनचा पहिलाच दमदार पाऊस झाल्याने अकोलेकरांना दिलासा मिळाला; पण याच पावसात सर्वोपचार रुग्णालयातील स्वच्छतेचे धिंडवडे निघाले. रुग्णालय परिसरातील गटारात शिळ््या अन्नाचा खच अन् परिसरातील अस्वच्छतेमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. हा प्रकार रुग्णांसह डॉक्टर अन् कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच सर्वोपचार रुग्णालयात अस्वच्छता आणि त्यामुळे पसरणारी दुर्गंधी ही नेहमीच असते; परंतु ऐन पावसाळ््याच्या दिवसात ही अस्वच्छता रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी घातक ठरू शकते. असे असले तरी पावसाळ््यात येथील अस्वच्छतेचे प्रमाण नेहमीच्या तुलनेत वाढलेले दिसून येते. रविवारी झालेल्या पाहिल्याच पावसात हे वास्तव निदर्शनास आले. वॉर्ड क्रमांक सहाकडे जाणाºया मार्गावर पाणी साचले असून, काहींनी येथेच लघुशंका केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येथून बालरुग्ण विभागाकडे जाताना खुल्या जागेत मोठ्या प्रमाणात शिळे अन्न टाकून देण्यात आल्याचे निदर्शनास आले. हे खाद्यपदार्थ पावसात भिजल्याने सर्वत्र दुर्गंधी व माशा पसरल्या आहेत. रुग्णालय व परिसरातील अस्वच्छता रुग्णांसोबतच डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.येथे फेकल्या जाते शिळे अन्नरुग्ण व त्यांचे नातेवाईक शिळे झालेले अन्न बालरुग्ण विभाग परिसरातील खुल्या जागेत फेकून देतात. या परिसराची स्वच्छता कधीच करण्यात येत नसल्याने येथे शिळ््या अन्नाचा खच लागला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माशांची उत्पत्ती झाली आहे.सेफ्टिक टँक लिकेजसर्वोपचार रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमधील स्वच्छता गृहाचे सेफ्टिक टँक लिकेज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सेफ्टिक टँकच्या लिकेजमुळेदेखील परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

अस्वच्छतेतच करावे लागते भोजनसर्वोपचार रुग्णालय परिसरात रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना भोजन करण्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे परिसरातील अस्वच्छतेमध्येच त्यांना भोजन करावे लागते. हा प्रकार त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय