शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत’च्या पहिल्या टप्प्यातून नवीन प्रभाग बेदखल!

By admin | Updated: April 3, 2017 02:50 IST

नवीन प्रभागात पाणीपुरवठा कधी?

अकोला, दि. २- महापालिकेसाठी मंजूर झालेल्या ह्यअमृतह्ण योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा करण्याचा समावेश आहे. शासनाकडून ११0 कोटी ८४ लाख रुपये मंजूर झाले असून, मनपा प्रशासनाच्या ८७ कोटी रुपयांच्या निविदेला मंजुरीदेखील मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात होणार्‍या कामामध्ये नवीन प्रभागांचा समावेश नसल्याची माहिती आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा कधी होणार, असा सवाल उपस्थित झाला आहे. महापालिकेसाठी केंद्र व राज्य शासनाने मंजूर केलेल्या ह्यअमृतह्ण योजनेंतर्गत शहराची पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने २५४ कोटींचा ह्यडीपीआरह्ण(प्रकल्प अहवाल) तयार केला. शासनाने पहिल्या टप्प्यात ११0 कोटी ८४ लाखांचा प्रस्ताव मंजूर केला. महान धरण ते अकोला शहरापर्यंंंतची मुख्य जलवाहिनी बदलणे, शहरातील मुख्य जुन्या जलवाहिनीच्या बदल्यात नवीन जलवाहिनी टाक णे, शहराच्या विविध भागात आठ जलकुंभांची उभारणी करणे आदींसह विविध कामांचा समावेश आहे. महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी जारी केलेल्या ८७ कोटी ३५ लाखांच्या कामाच्या निविदेला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. शहरात पहिल्या टप्प्यातील कामांना सुरुवात होणार असली, तरी यामध्ये नवीन प्रभागातील कामांचा समावेश नसल्याची माहिती आहे. हद्दवाढीनंतरही प्रभाग दुर्लक्षित का?महापालिकेच्या हद्दवाढीची घोषणा ३0 ऑगस्ट २0१६ रोजी झाली. हद्दवाढीनुसार सामील झालेल्या मलकापूर, शिवणी, शिवर, खरप, मोठी उमरी, गुडधी, डाबकी, गजानन नगर, शिलोडा, न्यू तापडिया नगर, सोमठाणा, अकोली खु. आदी भागात पाणीपुरवठय़ाची ठोस यंत्रणा कार्यान्वित नसल्याची परिस्थिती होती. मजीप्राने तयार केलेल्या ह्यडीपीआरह्णमध्ये नवीन प्रभागांचा समावेश करण्यासाठी मनपाने पुढाकार घेण्याची गरज होती. हद्दवाढीनंतरही नवीन प्रभाग दुर्लक्षित राहिल्यामुळे मजीप्रा व महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होतात. पाण्याचा धर्म झाला भ्रष्ट!कधीकाळी नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आल्यास त्यांना मोफत पाणी उपलब्ध करून दिल्या जात होते. त्यासाठी समाजसेवी व्यक्ती तसेच सामाजिक संस्था पुढाक ार घेत. आता मात्र नागरिकांना पाणी हवे असल्यास चक्क पैशांच्या मोबदल्यात त्याची विक्री केली जाते. नवीन प्रभागांमध्येदेखील अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांना पाण्याची खरेदी करून तहान भागविण्याची वेळ आली आहे.