शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

माना पोलीस ठाण्याला मिळाले अमरावती विभागातील पहिले आंतरराष्ट्रीय मानांकन

By admin | Updated: June 12, 2016 02:31 IST

परीविक्षाधीन पोलीस अधिकारी गोयल यांची कामगिरी.

मूर्तिजापूर(जि.अकोला): समाजात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पोलीस प्रशासनापुढे नवनवी आव्हाने निर्माण होत आहेत. खून, मारामार्‍या, दरोडा, चोर्‍या अशा घटनांचा परिणाम कायदा व सुव्यवस्था राखणार्‍या पोलीस यंत्रणेवर होतो. अशा परिस्थितीत अवघ्या तीन महिन्यातच परीविक्षाधीन पोलीस अधिकारी निमित गोयल यांनी माना पोलीस ठाण्याला अमरावती परिक्षेत्रात प्रथमच आंतरराष्ट्रीय (आयएसओ) मानांकन मिळवून दिले आहे. गुन्हेगारीवर अंकुश ठेवीत प्रशासकीय कामात अत्याधुनिक सुसूत्रता आणून त्यांनी आदर्श घडविला असून हे कार्य इतरांसाठी अनुकरणीय ठरणारे आहे.राज्यात कर्तृत्ववान पोलिसांची कमी नाही. अनेक पोलीस अधिकारी स्वत:चा जीव धोक्यात घालून सामाजिक सुरक्षा करीत आहेत. समाजातील निर्माण झालेल्या समस्यांना सोडविण्यासाठी कर्तव्य चोख बजावतात. गुन्हेगारीवर वचक ठेवतात. परीविक्षाधीन पोलीस अधिकारी (भाप्रसे) निमित गोयल यांनी एप्रिल २0१६ ला तालुक्यातील माना पोलीस ठाण्याचा प्रभार सांभाळला. माना पो. स्टे. अंतर्गत गावांची लोकसंख्या ७५ हजाराच्या जवळपास आहे. मानाअंतर्गत ३१ ग्रामपंचायती येतात. ५१ कार्यक्षेत्राचा भार सांभाळून गोयल यांनी आपल्या कार्याचा धडका सुरू केला. सुयोग्यतेने गुन्हेगारीची प्रकरणे हाताळली. एकमेकांविषयी निर्माण झालेले समज-गैरसमज दूर करण्यात यशस्वी ठरून ३0 गावे तंटामुक्ती केली आहे. परीविक्षाधीन पोलीस अधिकारी निमित गोयल यांनी हे सर्व निकष अवघ्या तीन महिन्यातच ९0 टक्के पूर्ण केले आहे. ठाण्याच्या इमारतीची डागडुजी, रंगकाम, कंपाउंड, बोअरवेल, सौरऊर्जा दिवे व्यवस्था, संगणकीकरण यासह बिनतारी संदेश कक्ष, स्टेशन डायरी कक्ष, गुन्हे विभाग कक्ष, बारनिशी मोहरर कक्ष, मुद्देमाल कक्ष, आदी विभाग सुसज्ज करण्यात आले आहे. हे काम लोकसहभागातून करण्यात आले असून यासाठी आमदार हरिष पिंपळे व अन्य लोकप्रतिनिधींनी मोलाचे योगदान दिले आहे. माना परिक्षेत्रातील ठिकठिकाणी, महामार्गावरील झाडांवर पोलीस स्टेशन व संबंधितांचे मोबाइल नंबर स्टिकर स्वरूपात लावले. अमरावती परिक्षेत्रात जवळपास १५0 च्यावर पोलीस ठाणे येतात; मात्र परीविक्षाधीन पोलीस अधिकारी गोयल यांच्या कार्यकुशलतेमुळे माना पोलीस ठाण्याला ह्यआयएसओह्णचा पहिला मान मिळाल्याने गोयल यांनी याप्रकारे इतरांपुढे प्रेरक आदर्श ठेवला आहे.