शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

‘गॉडफादर’शिवाय पहिलीच निवडणूक!

By admin | Updated: September 17, 2014 02:27 IST

इच्छुकांची फरपट: उमेदवारांना भासणार दिवंगत नेत्यांची उणीव.

अजय डांग/ अकोलाशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, कॉँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि भाजपचे केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यासारख्या दिग्गज नेत्यांच्या पश्‍चात होणारी विधानसभेची यावेळची पहिलीच निवडणूक. या दिवंगत लोकनेत्यांची आपआपल्या पक्षात सर्मथकांची फौज आहे. या लोकनेत्यांची उणीव त्या-त्या पक्षाला ज्याप्रमाणे भासत आहे, त्याचप्रमाणे उमेदवारीसाठी झगडणार्‍या इच्छुकांनाही भासत आहे. बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यासारखे महाराष्ट्रातील लोकनेते गत वर्ष-दोन वर्षात काळाच्या पडद्याआड गेले. आपल्या हयातीत राजकीय उंची गाठलेल्या या लोकनेत्यांना मानणारी सर्मथकांची फौज अख्ख्या महाराष्ट्रात पसरली आहे. पक्षाच्या सच्च्या कार्यकर्त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार्‍या या लोकनेत्यांना महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले. भाजप नेते गोपीना थ मुंडे पक्षावर नाराज असताना, त्यांच्या सर्मथनार्थ महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांनी दिलेले राजीनामे किंवा सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका हाकेवर पेटून उठणारे शिवसैनिक ही त्यांच्या लोकप्रियतेची पोचपावती होती. अशा या लोकनेत्यांची उणीव त्या-त्या पक्षांना पदोपदी भासत आहे. या सर्वमान्य नेत्यांच्या पश्‍चात खरी फरपट होत आहे ती उमेदवारांची. निवडणूक आली की, पक्षाशी संबंध नसलेले कार्यकर्ते एका रात्रीतून नेते होतात आणि उमेदवारीसाठी पक्षनेत्यांकडे मोर्चेबांधणी करतात. पक्षासाठी अहोरात्र झटलेल्या कार्यकर्त्यांवर मात्र अनेकदा अन्याय होतो. अशा अनेक कार्यकर्त्यांच्या पदरी त्यांच्या गॉडफादरच्या पश्‍चात निराशा आल्याचे पाहावयास मिळत आहे. गटातटाचे राजकारण प्रत्येक पक्षात फोफावले आहे. या राजकारणाचा बळी हे प्रामाणिक कार्यकर्ते ठरत आहेत. महाराष्ट्राची नाडी ठाऊक असलेल्या या लोकनेत्यांच्या पश्‍चात पक्ष थांबला नाही, कुणी तरी त्यांची धुरा सांभाळलीच; पण त्यांना साहेबांची सर येत नाही असे अनेक जुणे-जाणते कार्यकर्ते खिन्न मनाने बोलून दाखवतात.