शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आधी स्वच्छतागृह तोडले; आता निकृष्ट साहित्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 12:38 IST

अकोला: महापालिकेत शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी असणारे स्वच्छतागृह शिकस्त नसताना ते तोडण्याचा प्रताप समोर आला आहे.

अकोला: महापालिकेत शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी असणारे स्वच्छतागृह शिकस्त नसताना ते तोडण्याचा प्रताप समोर आला आहे. स्वच्छतागृह तोडल्यानंतर नव्याने बांधकाम करण्यासाठी अतिशय निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याची बाब प्रभाग क्रमांक १८ मधील भाजपचे नगरसेवक अमोल गोगे यांच्या निदर्शनास येताच सदर बांधकाम बंद करण्यात आले आहे. असे असले, तरी स्वच्छतागृह शिकस्त नसताना ते तोडून बांधण्याचा खटाटोप का, असा प्रश्न उपस्थित झाला असून, शिक्षण विभाग, मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ चे मुख्याध्यापक व कनिष्ठ अभियंता वादाच्या भोवºयात सापडले आहेत.प्रभाग क्रमांक १८ अंतर्गत येणाºया शिवसेना वसाहतमध्ये मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ असून, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती या शाळेचे नाव मोठ्या आदराने घेतल्या जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी प्रभागातील माजी नगरसेवक दिलीप देशमुख तसेच भाजपचे विद्यमान नगरसेवक अमोल गोगे, नगरसेविका जयश्री दुबे सतत प्रयत्नरत असल्याचे दिसून येते. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी शाळेत सुस्थितीत स्वच्छतागृह असताना ते तोडण्याचा प्रताप शिक्षण विभागातील भ्रष्ट प्रवृत्तीच्या अधिकाºयांनी केल्याचे समोर आले आहे. निविदेनुसार १० फूट बाय ८ फूट असे बांधकाम अपेक्षित असताना प्रत्यक्षात ८ फूट बाय ६ फूट असे बांधकाम होत असून, त्यासाठी लागणारे साहित्य अत्यंत निकृष्ट व दर्जाहीन असल्याची माहिती नगरसेवक अमोल गोगे यांना मिळाली. अमोल गोगे यांनी तातडीने शहर अभियंता सुरेश हुंगे यांना अवगत केले असता, सुरेश हुंगे यांनी प्रत्यक्षात कामाची पाहणी केली असता निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याची बाब उघडकीस आली. स्वच्छतागृहाच्या बांधकामावर नियुक्त केलेले कनिष्ठ अभियंता नरेश कोपीकर यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. निकृष्ट बांधकामामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेता सदर बांधकाम बंद करण्याचे निर्देश शहर अभियंता सुरेश हुंगे यांनी दिले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका