शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोफत वायफाय सुविधा देणारी राज्यातील पहिली आश्रमशाळा अकोल्यात

By admin | Updated: April 9, 2016 01:38 IST

प्रगतीच्या दिशेने एक पाऊल; आज लोकार्पण सोहळा.

संतोष गव्हाळे/ हातरूण (जिल्हा अकोला)ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची जोड मिळावी, ते स्पर्धेत मागे राहू नये, यासाठी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरूण येथील स्व. नर्मदाबाई बनारसीलाल अग्रवाल प्राथमिक आश्रमशाळेने पुढाकार घेतला असून, शाळेत डिजिटल क्लासरूमच्या संकल्पनेसोबतच मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सुविधेचा लोकार्पण सोहळा शनिवारी आयोजित केला असून, वायफाय सुविधा देणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच आश्रमशाळा ठरणार आहे. शासनाकडून डिजिटल शाळांसाठी जनजागृती करण्यात येत आहे. शाळा डिजिटल होण्यासाठी काही ठिकाणी शिक्षक, समाजातील विविध घटक, ग्रामस्थही पुढाकार घेत आहेत. सामाजिक दायित्व म्हणून लोकवर्गणीही करण्यात येते. हीच जाणीव ठेवून आता निवासी आश्रमशाळेत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इंटरनेटच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी अग्रेसर राहावा, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून डिजिटल क्लासरूमच्या संकल्पनेसोबतच वायफाय सुविधा मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकार्‍यांची उपस्थिती महाराष्ट्रात पहिलीच डिजिटल क्लासरूम व मोफत वायफाय सुविधेचा उद्घाटन सोहळा शनिवारी सकाळी १0 वाजता होणार आहे. उद्घाटन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, आमदार बळीराम सिरस्कार, प्रादेशिक उपायुक्त दीपक वडकुते (अमरावती), सहायक आयुक्त शरद चव्हाण (अकोला), गोविंद गुंजाळ, सुभाषचंद्र अग्रवाल, भगवानदास अग्रवाल, मुकेश गव्हाणकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांना होणार फायदासामाजिक न्याय विभागांतर्गत भटक्या जाती, विमुक्त जमातीसाठी कार्यरत असलेल्या हातरुण येथील निवासी आश्रमशाळेत इयत्ता १ ते ७ मध्ये २१२ विद्यार्थी शिकत आहेत. शाळेत अकोला जिल्हय़ातील अडसूळ, तेल्हारा, मनात्री, चित्तलवाडी, दगडपारवा, दाळंबी, कोळंबी, निंबा, वाडेगाव, खांबोरा या परिसरातील विद्यार्थी शिकत आहेत.