शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दोन गोदामांना आग

By admin | Updated: February 5, 2016 02:23 IST

मलकापूर येथील आगीत ३७ लाखांचे नुकसान, दहा तासांनंतर आग आटोक्यात.

मलकापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मलकापूरनजीक दोन गोदामांना अचानक आग लागून ३७ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशामक दलाने तब्बल दहा तासांच्या परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली. अद्याप या आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. मुक्ताईनगर मार्गावर असलेल्या लक्ष्मी फर्निचर व सय्यद अँण्ड ट्रेडिंग कंपनी नामक दोन गोदामांना गुरुवारी पहाटे आग लागली. गब्बूभाई रामलाल देसार व संतोष रामलाल देसार यांच्या मालकीचे हे गोदाम आहेत. येथे व्यवसायाकरिता आणलेले सागवान, निंबाची लाकडे तसेच त्यापासून बनविलेले फर्निचर, दरवाजे, खिडक्या, चौकटी, पलंग, सोफासेट व यंत्रसामग्री असे साहित्य या आगीत जळून खाक झाले. सय्यद जलील सय्यद मुनाफ व त्यांचे बंधू यांच्या गोदामामधील टायर, ट्यूब, प्लास्टिक, लोखंडी वस्तूंचीही मोठय़ा प्रमाणावर हानी झाली असून, बरेचसे साहित्य जळून खाक झाले. नेमक्या कोणत्या कारणामुळे ही आग लागली, ही बाब अद्यापही स्पष्ट झालेली नाही. आगीची माहिती मिळताच पालिकेचे अग्निशामक दलाचे बंब, खासगी टँकर घटनास्थळी बोलावून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. आगीची भीषणता पाहता, लक्ष्मी फर्निचरच्या मागील गेटने जेसीबीद्वारे साहित्य हटवून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. दुपारी आगीचे लोळ थांबले; मात्र त्याउपरही धुराचे लोट तेथून सुरूच होते. दुपारी ४ वाजता ही आग पूर्णत: आटोक्यात आली. तहसीलदार रवींद्र जोगी, पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी केली. महसूल विभागाच्यावतीने तलाठी मनोज एदलाबादकर यांनी दुपारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानुसार देसार बंधूंचे २५ लाखांचे, तर सय्यद बंधूंचे १२ लाख रुपयांचे असे एकूण ३७ लाख रुपयांचे नुकसान आगीत झाले.