शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मोताळा, डोणगाव येथे आगीत दुकाने खाक!

By admin | Updated: November 13, 2015 01:56 IST

आग लागून कापड दुकान खाक; लाखोचे नुकसान.

मोताळा (जि. बुलडाणा) : येथील आठवडी बाजार परिसरातील चुन्नु-मुन्नु ड्रेसेस या किड्स वेअरला ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर अचानक आग लागल्याने दुकानातील साहित्यासह संपूर्ण कपडे जळून खाक झाल्याची घटना बुधवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये सुमारे वीस लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही; मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज दुकानमालक कैलास धिरबस्सी यांनी व्यक्त केला आहे. नांदुरा रोडवरील आठवडी बाजार परिसरात असलेल्या कैलास सीताराम धिरबस्सी तरोडा ता. मोताळा यांच्या चुन्नु-मुन्नु ड्रेसेस (किड्स वेअर) या दुकानाला ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर अचानक आग लागली. दिवाळीचा हंगाम असल्याने सदर व्यापार्‍याने मोठय़ा प्रमाणात खरेदी केलेली होती. आग लागताच काही क्षणातच दुकानातील कपडे व लाकडी साहित्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे दुकानातील सर्व साहित्य, फर्निचर, सब मीटर व कपडे जळून खाक झाले. दरम्यान, कपडे जळण्याच्या वासावरून ही बाब परिसरातील नागरिकांना कळताच शंकर मशीनरीचे मालक, रामेश्‍वर खंडागळे, सिमेंट हाऊसचे जुबेर शेठ, राजू मॅकेनिक आदींनी मिळेल त्या साधनांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. सदर दुकानाचे शटर बंद असल्याने आग विझविण्यासाठी मोठी अडचण आली होती. त्यामुळे राजू मॅके निक (कोथळी) ने दुकानावरील टीनपत्रे तातडीने काढून सहकार्यांंच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केलेत. पहाटे ४:३0 वाजेपर्यंंत आगीवर पूर्णत: नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने या दुकानाला लागून असलेल्या इतर दुकानांना आगीची बाधा पोहोचली नाही व पुढील अनर्थ टळला. बोराखेडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी वनारे व पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.