अकोला, दि. २७- सिव्हिल लाइन्स रोडवरील हॉटेल तंदुरी येथे सोमवारी सायंकाळी अचानक आग लागली. मनपाच्या अग्निशमन विभागाने एक बंब पाण्याद्वारे ही आग विझविली. सुदैवाने या आगीत कोणतीही हानी झाली नाही. सिव्हिल लाइन्स चौकाच्या समोर बँक ऑफ बडोदाच्या पुढे असलेल्या हॉटेल तंदुरी येथील किचन गृहाला अचानक आग लागली. या आगीत किचनमधील साहित्य जळून खाक झाले. मनपाच्या अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळ गाठून ही आग विझविली, त्यामुळे मोठी हानी टळली.
सिव्हिल लाइन्स रोडवरील हॉटेलला आग
By admin | Updated: March 28, 2017 01:47 IST