आकोट (अकोला) : स्थानिक मोठे बारगण परिसरात एका घराला आज पहाटे लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनंत सखाराम दाभाडे हे आपल्या कुटुंबासह घरात खाली झोपले होते. घराच्या वरच्या मजल्यावर अचानक आगीने पेट घेतल्याने गहू, कपडे, भांडीकुंडी, कूलर, रॅक आदीसह सर्व सामान जळून खाक झाले. वरच्या माळ्यावरील टीनपत्रेसुद्धा वाकली. यामध्ये अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अनंता कपले यांचेसुद्धा कांदा व टीन जळाले आहे. परिसरील लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अग्निशामक दलालासुद्धा पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळाचा पंचनामा मंडळ अधिकारी प्रवीण घोटकर, तलाठी मोहोकार यांनी केला. आग नेमकी कशामुळे लागली, हे कळू शकले नाही.
आकोट येथे घराला आग; लाखोंचे नुकसान
By admin | Updated: October 28, 2014 00:31 IST