शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे इंजीनमधील अग्निशामक यंत्र रुळावर!

By admin | Updated: March 6, 2017 02:27 IST

खोडसाळपणाचा संशय; बॉम्ब शोधक व नाशक पथक दाखल.

अकोला, दि. ५- अकोला ते शेगाव रेल्वे रुळावर अकोट फैल पुलाखाली रेल्वे इंजीन बदलण्याच्या ठिकाणावर रेल्वे इंजीनमधील अग्निशामक यंत्र काढून ते रुळावर टाकल्याची खळबळजनक घटना रविवारी पहाटे घडली. रेल्वे रुळावर घडलेल्या या गंभीर घटनेची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी रेल्वे रुळाची पाहणी केली. दरम्यान, या प्रकरणी जीआरपीने अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे रुळावर इंजीन बदलण्यासाठी ह्यआउटरह्ण आहे. रविवारी पहाटे या ठिकाणावर रेल्वेचे इंजीन उभे असताना अज्ञात व्यक्तीने इंजीनमधील अग्निशामक यंत्र बाहेर काढले आणि रुळावर फेकले. सदर अगिशामक यंत्र रुळाच्या बाजूला पडल्याने ते पंर झाले. काही वेळातच यामधील द्रवाची गळती सुरू झाली. या परिसरात काही प्रमाणात धूर निघाल्याने नागरिकांनी या यंत्राचा स्फोट झाल्याची अफवा केली; मात्र या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. यासोबतच दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, स्थानिक गुन्हे शाखा, तसेच श्‍वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. या सर्व यंत्रणेद्वारे तपासणी केल्यानंतर अग्निशामक यंत्र हे रेल्वे रुळाच्या बाजूला पंर झाल्याने त्यामधील वायूची गळती झाल्याचे निष्पन्न झाले; मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास यंत्रणेद्वारे या घटनेचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. रेल्वे इंजीनमधील अग्निशामक यंत्र इंजीनमधून काढून बाहेर फेकण्यात आले. या यंत्राच्या मुख्य बाजूला धक्का पोहोचल्याने ते पंर होऊन वायुगळती झाली. या वायुगळतीमुळे स्फोट झाल्याच्या तशाच अनेक प्रकारच्या अफवा करण्यात आल्या; मात्र यंत्रणेद्वारे तपासणी केली असता हा प्रकार खोडसाळपणाचा असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. काहीही असले तरी पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे.विजयकांत सागर,अतिरिक्त पोलीस अधीक्षक, अकोला यंत्रणांकडून तपासणीया घटनेची तत्काळ पाहणी करून दहशतवादविरोधी पथक, बॉम्बशोधक नाशक पथक, श्‍वानपथकाद्वारे तपासणी करण्यात आली; मात्र रात्री उशिरापर्यंत हा प्रकार घातपाताचा नसल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस यंत्रणा आली तरी तपास गाभीर्ंयाने सुरू आहे. अग्नीशामक यंत्र फेकल्याने त्यामधून वायुगळती झाली आणि या वायूच्या गळतीमुळे काही प्रमाणात धूर निर्माण झाला होता.