शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सस्ती येथे शॉर्ट सर्किटमुळे कृषी केंद्राला आग

By admin | Updated: March 31, 2017 01:48 IST

आगीत १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

दिग्रस बु. (जि. अकोला), दि. ३0- नजीकच्या सस्ती येथे गुरुवार रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास बळीराजा कृषी सेवा केंद्राला आग लागली. या आगीत १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सस्तीमधील श्रीकृष्ण भगत यांनी भाडेतत्त्वावर मोहन नागपुरे यांना कृषी सेवा केंद्र चालविण्यासाठी जागा दिली होती. या दुकानामध्ये मोहन नागपुरे हे सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंंत विक्री करीत होते. त्यानंतर ते जेवण करण्यासाठी घरी गेले असता, त्या दुकानातून धूर निघत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. यावेळी गावातील लोकांनी धावपळ करून आग विझण्याचा प्रयत्न केला; परंतु दुकानाचे कुलूप उघडेपर्यंत पूर्ण दुकानातून आगीच्या ज्वाला बाहेर पडत होत्या. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. यावेळी ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्यांना बोलावले; परंतु अग्निशामक दलाच्या गाड्या आग आटोक्यात आल्यावर पोहोचल्या. या दुकानात कीटकनाशक , १५ पोते तूर, शेतीचे साहित्य व २५ हजार रुपयांच्या नोटांचे बंडल होते. या आगीत १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तलाठय़ाने पंचनाम्यात नमूद केले. यावेळी शिवसेना शाखाप्रमुख नितीन देशमुख, गावातील सरपंच, चान्नीचे पोलीस, तलाठी, तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांनी घटनास्थळाला भेट दिली.