शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या वाहनावर हजाराेंचा दंड तर नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 10:09 IST

Akola News : प्रत्येकावर आता तुमच्या वाहनावर हजाराेंचा दंड थकीत तर नाही ना, असा सवाल करण्याची वेळ आली आहे.

- सचिन राऊत

अकाेला : वाहन चालविताना वाहतुकीचे नियम न पाळणारे तसेच वाहनाचे दस्तऐवज साेबत न ठेवणाऱ्या वाहनचालकांवर मे २०१९ पासून ई चालानद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे़ गत दाेन वर्षांत तब्बल दीड काेटीच्या सुमारास दंड ई चालानचा थकीत असून हजाराे वाहनांवर दंड थकीत असल्याने अशा वाहनचालकांना वाहतूक शाखेकडून नाेटीस पाठविण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येकावर आता तुमच्या वाहनावर हजाराेंचा दंड थकीत तर नाही ना, असा सवाल करण्याची वेळ आली आहे.

वाहतूक शाखेचे कामकाज आता अद्ययावत हाेत असून गतीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर स्पीड गन कारद्वारे कारवाई करण्यात येते, तर मद्यपींची आराेग्य तपासणी करून दंडात्मक तसेच फाैजदारी कारवाई करण्यात येत आहे़ आतई चालान पध्दतीद्वारे राज्यात कुठेही दंड भरण्याची सुविधा असल्याने तसेच दंडाची रक्कम वाहनावर थकीत राहत असल्याने हजाराे वाहनचालक दंड भरत नसल्याचे वास्तव आहे़ त्यामुळे हजाराे वाहनांवर काेट्यवधी रुपयांचा दंड थकीत आहे़ जिल्ह्यात ही रक्कम दीड काेटीच्या घरात दंड थकीत असून वसुलीसाठी पाेलिसांनी आता नाेटीस बजावली आहे.

 

वर्ष कारवाया वसूल दंड

२०१९ ५९५५६ १२२५८९००

२०२० ७४१२८ ७१९४६००

२०२१ ६००००            ५० लाखांच्या सुमारास

 

कसे फाडले जाते ई चालान

एखाद्या वाहनाने नियमाचे उल्लंघन केल्यानंतर त्या वाहनाचा क्रमांक ई चालान पद्धतीत घेऊन त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते़ यावेळी वाहनचालकाचा परवाना घेऊन ताे मशीनमध्ये तपासल्या जातो. वाहनावर किंवा वाहनचालकाच्या परवान्यावर दंडात्मक रक्कम आपाेआप समाेर येते़ आधी दंड असेल तर नवीन दंड करण्यास अडचणी येतात़ त्यामुळे अशावेळी वाहनचालकाला आधीचा दंड भरणे बंधनकारक आहे़ मात्र, असे असले तरीही काेट्यवधी रुपयांचा दंड थकीत असल्याचे वास्तव आहे़

 

माेबाइल अपटेड केला आहे का?

वाहनचालकाचा माेबाइल क्रमांक आता संलग्नित करण्यात येतो. त्यामुळे माेबाइल क्रमांक व आरसी क्रमांक अपडेट करणे गरजेचे आहे़ तुमच्या माेबाइल क्रमांकावरच दंडाची पावती ऑनलाइन पाठविल्या जाते़ त्यामुळे तुमचे बँक खाते व इतर शासकीय कामासाठी दिलेला माेबाइल क्रमांक वाहन घेतानाही अपडेट करणे गरजेचे आहे़

दंडाची थकबाकी वाढली

ई चालान पद्धतीमध्ये दंड उधारीवर ठेवण्याची मुभा आहे़ त्यामुळे प्रत्येक वाहनचालक पैसे नसल्याचे कारण देऊन त्या ठिकाणावरून निघून जाताे. त्यानंतर पुन्हा ते वाहन पकडेपर्यंत त्याला दंड भरावा लागताे, ही माहिती नसते़ त्यामुळे असा सुमारे दीड काेटी रुपयांचा दंड जिल्ह्यात थकीत असून पाेलिसांनी अशा वाहनचालकांना नाेटीस बजावत दंडाची रक्कम भरण्याच्या सूचना केली आहे.

 

थकीत असलेल्या दंडाची रक्कम भरण्यासाठी नाेटीस पाठविण्यात आलेली आहे. तसेच ही वसुली माेहीम आता वेगात सुरू करण्यात येणार आहे़ ज्या वाहनचालकांकडे रक्कम थकीत आहे, त्यांच्यावर फाैजदारी कारवाई करण्याचीही तरतूद आहे़ त्यामुळे अशा प्रकारे कारवाई करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात येणार आहे़

- विलास पाटील

वाहतूक शाखा प्रमुख, अकाेला