शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार पिडीत महिलांना ‘मनोधैर्य’चा आर्थिक आधार

By admin | Updated: September 30, 2015 00:46 IST

मनोधैर्य योजनेद्वारे आतापर्यंत राज्यातील २१४७ महिलांच्या व्यथांवर मायेची फुंकर घातली आहे.

संतोष वानखडे / वाशिम : लैंगिक अत्याचार पिडीत महिलांना मानसिक आधारासोबतच आर्थिक पाठबळ देण्याच्या दृष्टीकोनातून सुरू झालेल्या मनोधैर्य योजनेने आतापर्यंत राज्यातील २१४७ महिलांच्या व्यथांवर मायेची फुंकर घातली आहे. स्पर्धेच्या युगात चार भिंतीच्या आड असणारे विश्‍व महिलांना हळूहळू खुले होत गेले. नोकरी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण, कायद्याचे संरक्षण, कोणत्याही क्षेत्रात प्राधान्य देवून महिलांना सक्षम करण्याचे प्रयत्न केले जात असतानाच, दुसरीकडे अन्याय-अत्याचाराचे घावही त्या सोसत आहेत. बलात्कार, अपहरण, लैंगिक अत्याचार, अँसिड हल्ला या घटनांनी युवती व महिलांचे आयुष्यच उद्ध्वस्त होत आहे. विविध प्रकारचे कायदे, समाजधुरीणांचे प्रयत्न, पोलीस यंत्रणेचा दराराही महिलांवरील अन्याय-अत्याचार रोखण्यात अपुरा पडत असल्याचे अत्याचारीत घटनांच्या नोंदींवरून निदर्शनास येत आहे. महिलांवरील अन्याय-अत्याचार रोखण्यासाठी शासन अधिक कठोर कायदे अंमलात आणत आहे. आर्थिक व मानसिक आधार देण्यासाठी विविध प्रयत्न होत आहेत. या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने ऑक्टोबर २0१३ पासून ह्यमनोधैर्यह्ण योजना अंमलात आणली आहे. या योजनेंतर्गत लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना मानसिक व आर्थिक आधार तसेच पूनर्वसन करण्याला प्राधान्य दिले जाते. या योजनेंतर्गत जिल्हा क्षती सहाय्य व पूनर्वसन मंडळ गठीत करण्यात आले आहे. पीडित महिला, बालक यांच्या कुटुंबियांची यथास्थितीत तत्काळ भेट घेऊन त्यांना समुपदेशन, मार्गदर्शन व इतर सवलती देण्यासाठी मदत करण्याची जबाबदारी या मंडळावर टाकण्यात आली आहे. यात प्रामुख्याने महिला समुपदेशक, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक व्यक्ती व पोलिस अधिकारी यांचा समावेश आहे. बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार पिडीत युवती व महिलांना दोन लाख रुपये आणि विशेष प्रकरणांमध्ये तीन लाख रुपयांचा आर्थिक आधार तसेच समुपदेशन केले जाते. योजना सुरू झाल्याच्या पहिल्या वर्षात ८३0 पिडीत महिलांना पाच कोटी चार लाखाचे अर्थसहाय्य करण्यात आले तसेच दुसर्‍या वर्षी अर्थात २0१४-१५ या वर्षात १३१७ पिडितांना १५ कोटी १0 लाखांचे अर्थसहाय्य आणि मानसिक आधार देण्यात आल्याची नोंद राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या दप्तरी आहे.