शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:18 IST

पातुर: सततची नापिकी व शेतीसाठी घेतलेल्या कर्जाच्या विवंचनेतून ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्या शेतकरी कुटंबांसाठी नाम फाऊंडेशनने पुढाकार १५ ...

पातुर: सततची नापिकी व शेतीसाठी घेतलेल्या कर्जाच्या विवंचनेतून ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्या शेतकरी कुटंबांसाठी नाम फाऊंडेशनने पुढाकार १५ हजारांचा धनादेश देऊन आर्थिक मदत केली.

तालुक्यातील आस्टूल येथील भास्कर त्रंबक इंगळे (४२) या अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. तसेच सस्ती येथील संदीप हिरामन शेळके या युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला नाम फाऊंडेशनमार्फत सानुग्रह मदत म्हणून १५ हजार रुपयांचा धनादेश आरती भास्कर इंगळे व वैशाली संदीप शेळके यांना देण्यात आला. नाम फाऊंडेशनचे विदर्भ व खान्देशचे समन्वयक हरीश इथापे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा समन्वयक माणिक शेळके यांच्या हस्ते देण्यात आली. आतापर्यंत नाम फाउंडेशनने विदर्भ व मराठवाडा या भागात आठ गावे दत्तक घेतली असून, अनेक जिल्ह्यांमध्ये जलसंधारण, तलाव खोलीकरण, नद्यांमधील गाळ उपसणे अशी अनेक समाजोपयोगी कामे लोकसहभागातून केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४० शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. २८ कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी नाम फाऊंडेशनचे तालुका समन्वयक मंगेश गोळे, सस्ती येथील प्रतिष्ठित अरविंदजी महाले, अरुण बदरखे, अरविंद शेळके, मुरलीधर बदरखे, संजय शेळके, पवन शेळके आदी उपस्थित होते. (फोटो)