शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ६१ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 02:00 IST

अकोला : जिल्ह्यातल्या खारपाणपट्टय़ातील खांबोर   प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१  गावांना ४५ टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश  अखेर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी  गुरुवारी दिला. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा  मिळाला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांचा आदेश ‘लोकमत’ ने केला पाठपुरावाटंचाईग्रस्त गावांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातल्या खारपाणपट्टय़ातील खांबोर   प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१  गावांना ४५ टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश  अखेर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी  गुरुवारी दिला. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा  मिळाला आहे.यावर्षी अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा  योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान ये थील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध  आहे. त्यामुळे या धरणातील जलसाठा अकोला शहर  पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा  बंद करण्यात आला आहे. या पृष्ठभूमीवर  खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून  खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना  आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु  उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक  पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा गत ७  ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. आता या  पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा  सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिकुमार  पाण्डेय यांनी ७ सप्टेंबर रोजी दिला. टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने  पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे. खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांमधील  जलसंकटाच्या मुद्यावर गत ऑगस्टमध्ये ‘लोकमत’मध्ये  सातत्याने वृत्त प्रकाशित करण्यात आले होते, हे येथे  उल्लेखनीय.

‘या’ गावांना होणार टँकरद्वारे पाणीपुरवठा!आपातापा, खोबरखेड, जलालाबाद, मजलापूर, आख तवाडा, गोणापूर, शामाबाद, सुलतान अजमपूर, आपोती  खुर्द, आपोती बु., कौलखेड गोमासे, मारोडी, दापुरा,  अंबिकापूर, अनकवाडी, घुसर, घुसरवाडी, कासली बु.,  कासली खुर्द, लाखोंडा बु., लाखोंडा खुर्द, म्हातोडी,  नवथळ, खेकडी, परितवाडा, आगर, वल्लभनगर, हिंगणा  तामसवाडी, वैराट, गांधीग्राम, निराट, गोपालखेड, राजा पूर, धामणा, गोत्रा, पाळोदी, सांगवी खुर्द, सांगवी बु.,  फरमादाबाद, निंभोरा, कंचनपूर, अलियाबाद, बादला पूर, सांगळूद बु., सांगळूद खुर्द, वरोडी, वाकी, नावखेड,  धोतर्डी, दहीगाव, बहिरखेड, रामगाव, गोंदापूर, पळसो  बु., बहादरपूर, कौलखेड जहॉगीर, बोरगाव मंजू, नि पाणा, सुकळी व कानशिवणी इत्यादी ६१ गावांना  टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.