शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ग्रामसेवकांचे निलंबन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:57 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावे हगणदरीमुक्तीची कामे न झाल्याने नऊ ग्रामसेवकांना निलंबित करण्याचे आदेश मागे घेण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी मान्य केल्याने कामावरील बहिष्कार आंदोलन तूर्तास स्थगित केल्याचे महाराष्ट्र ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष रवीबाबू काटे, सरचिटणीस महेंद्र बोचरे यांनी पत्रकात म्हटले आहे. 

ठळक मुद्देकामावरील बहिष्कार तूर्तास मागे घेण्याचा निर्णयनिलंबनाची कारवाई मागे घेतलेले ग्रामसेवक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावे हगणदरीमुक्तीची कामे न झाल्याने नऊ ग्रामसेवकांना निलंबित करण्याचे आदेश मागे घेण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी मान्य केल्याने कामावरील बहिष्कार आंदोलन तूर्तास स्थगित केल्याचे महाराष्ट्र ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष रवीबाबू काटे, सरचिटणीस महेंद्र बोचरे यांनी पत्रकात म्हटले आहे.  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संपूर्ण तालुके हगणदरीमुक्त करण्यात मोठय़ा प्रमाणात अडचणी आहेत. वैयक्तिक शौचालयासाठी लाभार्थी उदासीन आहेत, त्यामुळे कंत्राटदारांकडून शौचालये बांधावी लागतात. लाभार्थी खड्डा खोदून देत नाहीत. त्याचे पैसे ग्रामसेवकांना द्यावे लागतात. एकट्या ग्रामसेवकाला ती कामे करावी लागतात. तरीही जिल्हय़ातील नऊ ग्रामसेवकांवर चुकीच्या माहितीच्या आधारे निलंबनाची कारवाई करण्यात आली. ग्रामसेवकांचे निलंबन मागे न घेतल्याने युनियनने २0 नोव्हेंबरपासून स्वच्छ भारत मिशनची सर्व कामे, मग्रारोहयो, वरिष्ठांना कुठलीही माहिती न देणे, अहवाल ऑनलाइन करण्याच्या कामावर बहिष्कार आंदोलन सुरू केले होते. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी कारवाई मागे घेत असल्याचे पत्र ग्रामसेवक युनियनला मंगळवारी प्राप्त झाले. त्यानुसार बहिष्कार आंदोलन मागे घेत असल्याचे जिल्हाध्यक्ष रवीबाबू काटे, सरचिटणीस महेंद्र बोचरे यांनी पत्रकात म्हटले आहे. 

निलंबनाची कारवाई मागे घेतलेले ग्रामसेवकनिलंबित झालेल्यांमध्ये चार ग्रामविकास अधिकार्‍यांमध्ये वाडेगाव येथील एस.व्ही. डोंगरे, हातरूण येथील पी.एन. जामोदे, बेलखेड येथील ए.एन. उंबरकर, भटोरी येथील पंकज गुजर यांचा समावेश आहे. ग्रामसेवकांमध्ये टाकळी खोजबोळचे व्ही.आर. अंधारे, सौंदळाचे जी.एस. भुस्कुटे, आडसूळचे जी.एस. गवळी, तेल्हारा तालुक्यातील खंडाळाचे एस.बी. काकड, बाळापूर पंचायत समितीतील ए.एम. शिंदे यांचा समावेश आहे. त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली. 

टॅग्स :Akola cityअकोला शहर