शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मुहूर्त सापडला; नोटीस दिल्यावर सव्वा वर्षाने अनधिकृत बांधकाम धराशायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 13:17 IST

अकोला: इमारतीचा भाग अनधिकृत असल्याचे मोजमापात आढळून आल्यानंतर अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेच्या दक्षिण झोन कार्यालयाला सव्वा वर्षांनंतर का होईना मुहूर्त सापडला.

ठळक मुद्देदत्तात्रय सदाशिव काळे यांच्या इमारतीचा अनधिकृत भाग जमीनदोस्त करण्याची कारवाई अतिक्रमण विभागाने पार पाडली.काळे यांनी निवासी इमारतीचे नियमापेक्षा जास्त बांधकाम केल्याची तक्रार आर.टी.मुळे यांनी वर्षभरापूर्वी मनपाकडे केली होती.इमारतीचे मोजमाप केले असता, ४७.७९ चौरस मीटर क्षेत्रफळाचे अनधिकृत बांधकाम आढळून आले.

अकोला: इमारतीचा भाग अनधिकृत असल्याचे मोजमापात आढळून आल्यानंतर अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेच्या दक्षिण झोन कार्यालयाला सव्वा वर्षांनंतर का होईना मुहूर्त सापडला. लोकमतमधील वृत्ताची दखल घेत महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या आदेशानुसार कौलखेडस्थित वझे ले-आउटमधील मालमत्ताधारक दत्तात्रय सदाशिव काळे यांच्या इमारतीचा अनधिकृत भाग जमीनदोस्त करण्याची कारवाई अतिक्रमण विभागाने पार पाडली.कौलखेड परिसरातील वझे ले-आउटमधील दत्तात्रय काळे यांनी निवासी इमारतीचे नियमापेक्षा जास्त बांधकाम केल्याची तक्रार आर.टी.मुळे यांनी वर्षभरापूर्वी मनपाकडे केली होती. प्रशासनाने काळे यांना बांधकामासाठी ६३ चौरस मीटर क्षेत्रफळाची बांधकाम परवानगी दिली असताना, काळे यांनी ११०.३९ चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम केले. अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी वजा तक्रार आर.टी. मुळे यांनी दक्षिण झोनचे क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र घनबहाद्दूर, नगर रचना विभागाकडे केली होती. मुळे यांच्या प्राप्त तक्रारीवरून प्रशासनाने मालमत्ताधारक दत्तात्रय काळे यांच्या इमारतीचे मोजमाप केले असता, ४७.७९ चौरस मीटर क्षेत्रफळाचे अनधिकृत बांधकाम आढळून आले. याप्रकरणी प्रशासनाने दत्तात्रय काळे यांना १२ एप्रिल २०१७ रोजी अंतिम नोटीस जारी केली होती. त्यानंतर झोन अधिकारी, नगर रचना विभागाने अनधिकृत बांधकाम काढण्याची कारवाई करणे अपेक्षित असताना चक्क सव्वा वर्षांपर्यंत प्रशासनाला मुहूर्तच सापडला नाही. अखेर लोकमतमधील वृत्ताची दखल घेत मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार, नगर रचना विभाग व अतिक्रमण विभागाने ९ जुलै रोजी इमारतीचा अनधिकृत भाग तोडण्याची कारवाई पार पाडली. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका