शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘इंटक’ कर्मचा-यांवर कोसळली वेतनकपातीची कु-हाड

By admin | Updated: January 7, 2016 02:29 IST

अकोला जिल्हा औद्योगिक न्यायालयाचा निकाल. लांबणीवर.

अकोला: राज्य परिवहन महामंडळाच्या परिपत्रकात एक दिवसाचा संप पुकारणार्‍या कर्मचार्‍यांच्या वेतनातून ८ दिवसांची वेतनकपात करण्याची तरतूद आहे. यासंदर्भात कारवाई करण्यासाठी अकोला विभागीय अधिकार्‍यांनी जिल्हा औद्योगिक न्यायालयात धाव घेतली हो ती. मात्र, ६ जानेवारी रोजी होणारी सुनावणी लांबणीवर पडल्याने, महिन्याच्या दर ७ तारखेला होणारे पगार एक दिवस आधीच सायंकाळपर्यंत कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा करावे लागत असल्याने आठ दिवसांची वेतनकपात करूनच ते जमा करण्यात आले असल्याची माहिती विभागीय अधिकार्‍यांनी लोकमतला दिली. २५ टक्के वेतनवाढीसाठी एसटीच्या इंटक संघटनेने १७ डिसेंबर रोजी एक दिवसीय राज्यव्यापी संप पुकारला होता. राज्यातील इतर विभागांप्रमाणेच अकोला विभागात देखील सं पाचे तीव्र पडसाद उमटले होते. इंटकच्या कर्मचार्‍यांनी संप यशस्वी करण्यासाठी आक्रमक भूमिका घेत बसगाड्यांच्या टायरमधील हवा सोडल्याने जीवनवाहिनी ठप्प पडली होती. विभागातील ९ बसस्थानकांहून सुटणार्‍या गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला तो वेगळाच. एकंदरित इंटकच्या संपामुळे अकोला विभागात ४४ लाखांच्यावर आर्थिक नुकसान झाले. मुंबई येथील केंद्रीय अधिकार्‍यांच्या निर्देशानुसार अकोला विभागीय अधिकार्‍यांनी परिपत्रका तील तरतुदीनुसार संप पुकारणार्‍या कर्मचार्‍यांची आठ दिवसांची वेतनकपात करण्यासंदर्भात जिल्हा औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. जिल्हा औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश हुड हे बुधवार, ६ जानेवारी रोजी या प्रकरणाचा निकाल देणार होते. मात्र, सुनावणी लांबणीवर पडली. महिन्याच्या दर ७ तारखेला होणारे पगार एक दिवस आधीच सायंकाळपर्यंत कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा करावे लागत असल्याने आठ दिवसांची वेतनक पात करूनच ते जमा करण्यात आले असल्याची माहिती विभागीय अधिकार्‍यांनी लोकम तला दिली. एसटी महामंडळाच्या वतीने अँड. एस. जी. गवई यांनी, तर इंटक संघटनेच्या व तीने अँड. वर्मा यांनी काम पाहिले.