शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या वेतनासाठी अडीच कोटी मिळाले !

By admin | Updated: October 15, 2016 03:10 IST

अकोला जिल्हय़ातील ९९१ ग्रामपंचायत कर्मचा-यांना मिळणार लाभ.

अकोला, दि. १४- जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी अखेर शासनामार्फत २ कोटी ६७ लाख ५८ हजार ६२४ रुपयांचे अनुदान अखेर १0 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. हा निधी लवकरच पंचायत समिती स्तरावर वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे गत पाच महिन्यांपासून वेतनापासून वंचित असलेल्या जिल्हय़ातील ९९१ ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना वेतनाचा लाभ मिळणार आहे.ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत कर्मचार्‍यांना घर, पाणी, दिवाबत्ती आणि आरोग्य इत्यादी ग्रामपंचायत कर वसुली, ग्रामपंचायत व गावातील नाल्या सफाई, नमुना-८ तयार करणे, गावातील जन्म-मृत्यूच्या नोंदी घेणे व दाखले तयार करणे आणि ग्रामसभा व ग्रामपंचायतीच्या मासिक सभेच्या नोटीस ग्रामपंचायत सदस्यांना पोहोचविणे इत्यादी कामे करावी लागतात. या कामापोटी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना दरमहा ५ हजार १00 रुपये वेतन दिले जाते. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वेतनाचा ५0 टक्के खर्च ग्रामपंचायत आणि ५0 टक्के खर्च शासनामार्फत सहायक अनुदान निधीतून भागविला जातो. अकोला जिल्हय़ातील सातही तालुक्यांत ९९१ कर्मचारी कार्यरत आहेत. सन २0१६-१७ या वर्षात जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी ३ कोटी ४१ लाख ६९ हजार ३00 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद पंचायत विभागामार्फत गत ऑक्टोबर २0१५ मध्ये शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे पाठविण्यात आला; मात्र शासनामार्फत निधी उपलब्ध झाला नसल्याने, गत एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांचे जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन रखडले होते. त्यामुळे वेतनापोटी सहायक अनुदानाचा निधी शासनामार्फत केव्हा मिळणार, याबाबत ग्रामपंचायत कर्मचार्‍यांकडून प्रतीक्षा केली जात होती. या पृष्ठभूमीवर ह्यनिधीत अडकले ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतनह्ण याबाबत ह्यलोकमतह्णमध्ये गत १४ सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित झाले होते, हे विशेष. अखेर जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वेतनापोटी शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत २ कोटी ६७ लाख ५८ हजार ६२४ रुपयांचे सहायक अनुदान १0 ऑक्टोबर रोजी प्राप्त झाले. उपलब्ध अनुदान जिल्हय़ातील सातही पंचायत समिती स्तरावर वितरित करण्यात येणार असून, पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना वेतनाची रक्कम वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे गत सहा महिन्यांपासून वेतनाविना असलेल्या जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी वेतनाचा लाभ मिळणार आहे.