शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कॅनॉलची मोजणी सुरू; ३० सप्टेंबरपर्यंत अल्टीमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 10:46 IST

अकोला : जुने शहरातील कॅनॉल रस्त्याच्या शासकीय मोजणीला मार्च महिन्यात प्रारंभ केल्यानंतर अवघ्या १० ते १२ दिवसांत भूमिअभिलेख विभागाच्या यंत्रणेने पळ काढला होता.

अकोला : जुने शहरातील कॅनॉल रस्त्याच्या शासकीय मोजणीला मार्च महिन्यात प्रारंभ केल्यानंतर अवघ्या १० ते १२ दिवसांत भूमिअभिलेख विभागाच्या यंत्रणेने पळ काढला होता. मागील सहा महिन्यांपासून कॅनॉलची मोजणी रखडल्याचा मुद्दा ‘लोकमत’ने सातत्याने लावून धरला. उशिरा का होईना, अखेर भूमिअभिलेख विभागाच्या यंत्रणेने कॅनॉलच्या मोजणीला पुन्हा प्रारंभ केला असून, आमदार गोवर्धन शर्मा, महापौर विजय अग्रवाल यांच्या सूचनांमुळे संपूर्ण कॅनॉलची मोजणी करण्यासाठी संबंधित यंत्रणेला ३० सप्टेंबरचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.जुने शहरात वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पर्यायी प्रशस्त रस्त्यांची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी डाबकी रोड ते राष्ट्रीय महामार्गावरील नवीन किराणा बाजारपर्यंत ३ हजार ४०० मीटर लांबीच्या कॅनॉल रोडचा पर्याय समोर आला. ही जागा पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असली तरी सात-बारावर ही जागा मूळ शेतमालकाच्या नावावर कायम असल्याचा घोळ तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, तत्कालीन मनपा आयुक्त अजय लहाने यांच्या निदर्शनास आला होता. त्यामुळे सात-बाऱ्याच्या फेरफार नोंदीचे काम नव्याने करण्यात आले. सात-बाराच्या माध्यमातून ही जमीन शासन दरबारी जमा झाली आहे. त्यामुळे मनपाने कॅनॉलच्या शासकीय मोजणीसाठी भूमिअभिलेख विभागाकडे ७ लाख ८४ हजार रुपये शुल्क जमा केल्यानंतर १२ मार्चपासून कॅनॉलच्या मोजणीला प्रारंभ केला. अवघ्या बारा दिवसांत ही मोजणी प्रक्रिया बंद पडली होती, हे विशेष.भूमिअभिलेखवर दबाव वाढला!गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता असणाºया भाजपाच्या लोकप्रतिनिधींसह मनपा पदाधिकारी कॅनॉल रस्त्यासाठी आग्रही असताना शासकीय मोजणीसाठी भूमिअभिलेख विभागाकडून जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचे दिसून आले. कॅनॉलची मोजणी प्रक्रिया बंद केल्यानंतर याविषयी भूमिअभिलेख विभागाने मनपाला अवगत केले नाही. एकूणच जिल्हा प्रशासनाची यंत्रणा लोकप्रतिनिधींसह मनपाला जुमानत नसल्याचे चित्र समोर येताच मोजणीसाठी भूमिअभिलेखवर दबाव वाढल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका