शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर काँग्रेसचा तिढा सुटला

By admin | Updated: March 19, 2015 01:31 IST

प्रदेशाध्यक्षांचा निर्णय; अकोला महापालिकेच्या गटनेतेपदी साजीद खान.

अकोला: महापालिकेत काँग्रेसच्या गटनेता निवडण्याचा तिढा अखेर बुधवारी सुटला. गटनेते पदाची धुरा विरोधी पक्षनेता साजीद खान यांच्यावर सोपवण्यात आली. प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी गटनेता पदासाठी साजीद खान यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले. गटनेतेपदाचा तिढा सुटताच काँग्रेसने स्थायी समितीची रखडलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गटनेता पदाची शिफारसवजा प्रस्ताव विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर यांच्याकडे सादर केला. मनपात स्थायी समितीच्या पुनर्गठनासाठी राजकीय पक्ष, गठित केलेल्या विविध आघाडीच्यावतीने नव्याने गटनेता पदाची निवड करून तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्याची प्रक्रिया सुरू होती. काँग्रेस पक्ष वगळता इतर राजकीय पक्ष व आघाड्यांनी गटनेत्याची निवड करीत प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला. यामध्ये विभागीय आयुक्तांनी सात गटनेत्यांची निवड केली, तर काँग्रेसमध्ये गटनेता निवडीवरून शीतयुद्ध रंगले. गटनेता पदाचा वाद थेट प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या दालनात पोहोचला. हा वाद आपसात चर्चा करून सोडण्यास प्रदेशाध्यक्षांनी सांगितले होते. मात्र, कोणताही निर्णय स्थानिक पदाधिकार्‍यांना घेता न आल्याने अखेर प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी गटनेता पदाची धुरा विरोधी पक्षनेता साजीद खान यांच्यावर सोपवविण्याचा निर्णय घेतला. याबाबतचा आदेश त्यांनी बुधवारी काढल्याने काँग्रेसमधील तिढा सुटला आहे. गटनेता पदाची निवड होताच शहर अध्यक्ष मदन भरगड यांच्यासह सर्व नगरसेवकांनी गटनेता निवडीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला.