अकोला : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणार्या योजनेंतर्गत ग् ोल्या तीन वर्षांपासून रखडलेले टिनपत्र्यांचे वाटप अखेर सोमवारपासून जिल्ह्यातील पंचायत समिती स्तरावर सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील ३ हजार ७00 लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत टिनपत्रे वाटपाची योजना राबविली जाते; मात्र या योजनेंतर्गत सन २0११-१२, २0१२-१३ आणि २0१३-१४ या तीन वर्षात अकोला जिल्हा परिषद समाजकल्याण विभागांतर्गत टिनपत्रे वाटपाची योजना रखडली. परिणामी निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील लाभार्थींंना टिनपत्रे योजनेच्या लाभापासून तीन वर्षे वंचित राहावे लागले. अखेर या योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ७00 लाभार्थींना टिनपत्र्यांचे वाटप सोमवारपासून सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सातही पंचायत समिती स्तरावर प्रत्येक लाभार्थीला पाच टिनपत्रे या प्रमाणे वाटप सुरु करण्यात आले. पंचायत समिती स्तरावर लाभार्थींंना टिनपत्र्यांचे वाटप सुरु करण्यासंदर्भात जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत सातही पंचायत समित्यांना पत्र पाठविण्यात आले असून, त्यानुसार टिनपत्रे वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अकोला पंचायत समितीमध्ये सोमवारी झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या हस्ते तालुक्यातील लाभार्थींंना टिनपत्रे वाटपास प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, सदस्य सरला मेश्राम,भारिप-बमसंचे एकनाथ शिरसाट, दिनकर वाघ, शेख साबीर उपस्थित होते.
अखेर टिनपत्र्यांचे वाटप सुरू
By admin | Updated: July 15, 2014 00:51 IST