शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ८४ खेडी अकोला जि.प.च्या गळ्य़ात!

By admin | Updated: April 2, 2017 03:04 IST

संयुक्त पाहणीनंतर एमजेपीने संपूर्ण रेकॉर्ड दिले ताब्यात

अकोला, दि. १-आधीच प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चालवणे जिल्हा परिषदेसाठी जिकिरीचे झाले असताना आता ८४ खेडी प्रादेशिक योजनेतील ७९ गावांना पुरवठय़ाची जबाबदारीही येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा विभागाच्या गळ्य़ात पडत आहे. मनुष्यबळ आणि तांत्रिक सेवा पुरवठय़ाच्या अभावात या योजनेकडे लक्ष देणे जिल्हा परिषदेसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. शासन आदेशाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ही योजना हस्तांतरित करून आपली मुक्तता करून घेतली, हे विशेष. अकोट ८४ खेडी योजनेतून अकोट, अकोला, तेल्हारा तालुक्यातील ७९ गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. त्याचवेळी या ग्रामपंचायतींकडे तब्बल १३ कोटी ९५ लाख ८२ हजार रुपये एवढी पाणीपट्टीची थकबाकी आहे. गेल्यावर्षी २0१५-१६ च्या टंचाईमध्ये योजनेला निधी मंजूर करतानाच तो हस्तांतरित करण्याचेही शासनाने बजावले. त्यावेळी १0 कोटी २0 लाख ७0 हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. टंचाई काळातील कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पूर्ण केल्यानंतर योजनेची देखभाल व दुरुस्ती, योजना व्यवस्थापन जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचे आदेशात नमूद होते. टंचाईतील विशेष दुरुस्तीची कामे ३१ मार्च २0१७ रोजी पूर्ण झाली. शासनाच्या आदेशानुसार, ही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग आधीच मोकळा होता. त्यामुळे जीवन प्राधिकरणाने जिल्हा परिषदेला १६ मार्च २0१७ रोजी पत्र दिले. त्यामध्ये १ एप्रिलपासून योजना हस्तांतरित करून घेण्याचे कळवण्यात आले. योजनेची संयुक्त पाहणीही पूर्णयोजना हस्तांतरित करण्यासाठी जीवन प्राधिकरणाने पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार यांच्यासह योजनेची संयुक्त पाहणी केली. त्यानंतर योजनेशी संबंधित संपूर्ण रेकॉर्ड पाणीपुरवठा विभागाकडे देण्यात आले. त्यानुसार ३१ मार्च रोजी रात्री १२ वाजतापासून जीवन प्राधिकरणाच्या यंत्रणेने पाणीपुरवठय़ाचे काम बंद करत असताना मुख्य कार्यकारी अधिकारी विधळे यांनी बैठक घेत पर्यायावर विचार करण्याचे सांगितले. त्यानुसार आणखी दोन ते तीन दिवस प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा सुरळित ठेवला जाणार आहे.योजनेवर अवलंबून असलेली गावे ८४ खेडी प्रादेशिक योजनेमध्ये सर्वाधिक गावे खारपाणपट्टय़ातील आहेत. त्यामध्ये अकोट तालुक्यातील लोहारी बुद्रुक, लोहारी खुर्द, मुंडगाव, लामकाणी, तांदूळवाडी, सोनबर्डी, आलेगाव, पिंप्री डिक्कर, देवरी, पाटसुल, वारुळा, वणी, बळेगाव, आलेवाडी, पळसोद, देवर्डा, पारळा, टाकळी खुर्द, निजामपूर, चोहोट्टाबाजार, करोडी, किनखेड, करतवाडी, पिलकवाडी, नखेगाव, राजुरवाडी, टाकळी बुद्रुक, नांदखेड, आगासखेड, सालखेड, धामणा बुद्रुक, कालवाडी, खापरवाडी बुद्रुक, खापरवाडी खुर्द, वरूर जऊळका, लोतखेड, दिनोडा, मरोडा, कावसा खुर्द, कावसा बुद्रुक, देऊळगाव, तरोडा, रेल, धारेल, गिरजापूर, पनोरी, दनोरी, केळीवेळी, जऊळखेड बुद्रुक, जऊळखेड खुर्द, धनकवाडी, ढगा, करतवाडी, कवठा खुर्द, कवठा बुद्रुक, सावरगाव, विटाळी, रौंदळा हिलालाबाद, हनवाडी, सांगवी, ठोकबर्डी, पुंडा, बांबर्डा, रोहनखेड, तेल्हारा तालुक्यातील नेर, पिवंदळ, गरसोळी, पातोंडा, अकोला तालुक्यातील दहीहांडा, वडद खुर्द, रोहणा, ब्रम्हपुरी, काटी-पाटी.