आकोट : माहेरहून पैसे आणण्याची मागणी पूर्ण न केल्याने २0 वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या फिर्यादीवरून सासरच्या लोकांविरुद्ध आकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनुसार, तालुक्यातील दहिखेड येथील पायल चंद्रशेखर गायकवाड (२0) हिचा विवाह दीड वर्षांपूर्वी चंद्रशेखर आनंदराव गायकवाड याच्यासोबत झाला. सुरुवातीला चांगले वागवल्यानंतर अलीकडे चारचाकी मोटार घेण्याकरिता माहेरहून पैसे आणण्यासाठी पती चंद्रशेखर आनंदराव गायकवाड, सासू पुष्पा आनंदराव गायकवाड, जेठ अमोल आनंदराव गायकवाड, मावस दीर लतीफ मोरे या चौघांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ चालवला होता. या प्रकरणाची तक्रार आकोट स्थित महिला तक्रार निवारण कक्षाने ग्रामीण पोलीस ठाण्याला लेखी दिल्यावरून संबंधित चारही जणांविरुद्ध भादंविच्या कलम ४९८, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
विवाहितेच्या छळप्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Updated: December 10, 2014 01:25 IST