पातूर : तालुक्यातील चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या अंधारसांगवी येथील जंगलात एका २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह बुधवारी आढळून आला. त्याच्या अंगावर कुर्हाडीचे वार असल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. चान्नी पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृतक तरुणाची ओळख पटली आहे. तो वाशिम जिल्ह्यातील वारा जहाँगीर येथील असून, त्याचे नाव राम प्रल्हाद पायघन असे आहे. रामच्या मृतदेहावर कुर्हाडीचे घाव दिसून येत आहेत. या तरुणाला मारहाण करून जंगलात आणून टाकल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. हनमंत पायघन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
तरुणाच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Updated: May 15, 2014 20:05 IST