शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अवैध सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: March 10, 2017 02:37 IST

सावकार सुरडकर हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अकोला, दि. ९-अवैध सावकारीतून प्रचंड संपत्ती जमवणारा वाशिम बायपास परिसरातील सावकार प्रकाश दत्तुजी सुरडकर याच्याविरुद्ध जुने शहर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. सावकार सुरडकर हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तालुका उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी गुरुवारी दिलेल्या तक्रारीनुसार अवैध सावकारी करणारा प्रकाश सुरडकर याच्याविरुद्ध गोपनीय तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार प्रकाश सुरडकर याच्या वाशिम बायपास परिसरातील घरात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी नियुक्त केलेल्या पथकाने बुधवारी छापा घातला. छाप्यामध्ये त्याच्या घरातून सहाशे ग्रॅम सोने, चांदी आणि कर्जदारांच्या शेतजमिनीशी संबंधित १८ खरेदी खत, नऊ पासबुक, एटीएम कार्ड आणि कर्जाच्या नोंदवहय़ांसह दीड लाखांची रोख रक्कम जप्त केली होती. यावरून सुरडकर हा विनापरवाना अवैध सावकारीचा व्यवसाय करीत असल्याचे स्पष्ट झाले. उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जुने शहर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी प्रकाश सुरडकर याच्याविरुद्ध अवैध सावकारी अधिनियम २0१४ कलम ३९ नुसार गुन्हा दाखल केला. सावकाराच्या घरातून पिस्तूल, काडतूस जप्तअवैध सावकारी करणारा प्रकाश सुरडकर हा अनेक वर्षांपासून अवैधरीत्या सावकारीचा व्यवसाय करीत होता. त्यासाठी त्याने पिस्तूल व काडतूससुद्धा खरेदी केले होते. त्याच्या घरातील छाप्यात महत्त्वाच्या कागदपत्रांसह देशी बनावटीचे पिस्तूल आणि काही काडतूससुद्धा पोलिसांनी जप्त केले. परवाना नसतानाही करायचा सावकारी व्यवसायसुरडकर याच्याकडे सावकारी व्यवसाय करण्याचा परवाना नव्हता. असे असतानाही तो लोकांना कर्ज द्यायचा. त्या बदल्यात त्यांची शेती, प्लॉट लिहून घ्यायचा. एवढेच नाही तर अनेकांकडून सोने, दागिनेसुद्धा ठेवून घ्यायचा आणि चक्रीवाढप्रमाणे कर्जदारांकडून बळजबरीने व्याज वसूल करायचा. प्रसंगी कर्जदारांना पिस्तूलचा धाकही दाखवायचा.